आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियंत्रण:जिल्हाभरात सण, उत्सव, यात्रांचे नियोजन;जिल्हा प्रशासनाकडून मनाई आदेश लागू, मोर्चा, निदर्शने, आंदोलने व धरणे आंदोलनात पाच व्यक्तींची मर्यादा

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात आगामी काळात साजऱे होणरे विविध सण, यात्रा व उत्सवांचा काळ असणारआहे. त्यानुसर जिल्हाभामध्ये कायदा व सुव्यवस्था सुरक्षीत रहावी, सामान्य नागरिकांना कोणत्याही अनुचित प्रकारांना सामोरे जाण्याची वेळ येऊ नये म्हणून जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्याच्या हद्दीत १२ मे रोजी मध्यरात्रीनंतर ते २४ मेपर्यंत मध्यरात्री मनाई आदेश लागू करण्यातआलेआहे, असेआदेश अपर जिल्हादंडाधिकारी संतोष राऊत यांनी काढलेआहेत.

या कालावधीमध्ये मोर्चा, निदर्शने, आंदोलने व धरणे आंदोलने, यांसारख्या आंदोलनामध्ये पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींचा समावेश असलेल्या कोणत्याही जमावास परवानगी शिवाय एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्या व्यतिरिक्त अन्य कोणतीही व्यक्तीस सार्वजनिक ठिकाणी किंवा त्याच्या जवळपास खालील गोष्टी करण्यास मनाई करण्यात आली आहे.

शस्त्रे, सोटे, काठी, तलवार,बंदुक, जवळ बाळगणार नाहीत, काट्या,लाठ्या शारीरिक इजा होण्यास कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील अशा वस्तू जवळ बाळगणार नाहीत, कोणतीही, दाहक पदार्थ किंवा स्फोटके जवळ बाळगणार नाहीत, दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, किंवा फोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधे गोळा करुन ठेवणार नाहीत किंवा बाळगणार नाहीत किंवा तयार करणार नाहीत, आवेशी भाषणे, अंगविक्षेपण, विडंबनात्मक नकला करणार नाही, सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा ज्यामुळे राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा अराजकता माजेल अशी चित्रे,निशाणी, घोषणा फलक किंवा इतर कोणत्याही वस्तू जवळ बाळगणार नाहीत, जाहीरपणे घोषणा करणे, गाणी म्हणणे,वादय वाजविणे किंवा कोणतीही कृती जे देशाच्या संविधानातील मुल्यांच्या विरुदध असेल किंवा देशाचा मान व सार्वभौमत्व यांना इजा पोहचवणारी असेल किंवा सार्वजनिक सुरक्षा आणि सामाजिक सलोखा यांना हानी पोहचवणरी असेल आणि जाहीरपणे प्रक्षोभक भाषण व असभ्य वर्तन करणार नाहीत.

व्यक्तींच्या किंवा शवांच्या किंवा प्रेते किंवा आकृती किंवा त्याच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणार नाहीत. पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींचा समावेश असलेल्या कोणत्याही जमावास परवानगी शिवाय एकत्र येता येणार नाही किंवा मिरवणूक, मोर्चा काढता येणार नाही.

बातम्या आणखी आहेत...