आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:बिंदुसरालगत 4 ठिकाणी 6 हजार बांबू राेपांची लागवड

बीड23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीपात्रालगतच्या तीन ठिकाणी, तर बिंदुसरा प्रकल्पाखालील भागात दहा एकरामध्ये ६ हजार बांबू वृक्षांची लागवड करण्यात आली. यासाठी वन विभागाने राेपे उपलब्ध करून दिलीत. रविवारी (दि. ११) सकाळी ७ वाजेपासून जिल्हा प्रशासनासह विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते या बांबूची लागवड करण्यात आली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त हा उपक्रम राबवण्यात आला. ही वृक्ष लागवड व संगोपन चळवळ वाढत राहिल्यास नक्कीच जिल्ह्यातील पर्यावरण सुरक्षित होईल, असे मत जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी या वेळी व्यक्त केले.

बीड येथे मानवी साखळीद्वारे बिंदुसरा नदीवरील धरणापासून ते बीड शहरापर्यंत नदीचे अंतरामधील ४ ठिकाणी ही बांबू वृक्ष लागवड केली. यासाठी शासकीय तंत्रनिकेतनसह औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, रोटरी क्लब बीडचे अध्यक्ष, ॲड. विवेकानंद सानप, दत्ता बारगजे आनंदग्राम पाली, डॉ. गणेश ढवळे, संजय आंबेगावे, क्रेडाई, बीड, पत्रकार, मिलिया महाविद्यालयाचे प्राचार्य, सौ. के. एस. के. महाविद्यालयाचे प्राचार्य, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष, सावरकर महाविद्यालयाचे प्राचार्य, बाल कल्याण समिती सदस्य सुरेश राजहंस, बीड क्रेडाईचे अध्यक्ष अतुल संघाणी, वनपाल एस. एस. ससाने, बलभीम महाविद्यालयासह बंकटस्वामी महाविद्यालयाचे प्राचार्य, आम्ही वृक्ष मित्र संघटनेचे बालाजी तोंडे, बाल कल्याण समिती अध्यक्ष अशोक तांगडे, रामनाथ खोड, तत्त्वशील कांबळे, राजश्री शाहू महाराज प्रतिष्ठानचे अध्यक्ष, तिरुमला ग्रुप बीडचे अध्यक्ष, सोमेश्वर मंदिर, आदित्य अभियांत्रिकीचे प्राचार्य, डेंटल मेडिकल महाविद्यालय, जिल्हा सी. ए. असोशिएशन, अध्यक्ष जिल्हा व्यापारी संघटना, चंपावती प्रतिष्ठान, डॉ. सुनीता बारकुल, डॉ. डिंपल ओस्तवाल, डॉ. सारिका वाघ आदी सहभागी होते. तर व्यवस्थापन समितीत जि.प.चे सीईओ, एसपींचा समावेश आहे.विभागीय वन अधिकारी सचिन कंद, उपअभियंता बोराडे, एम. आर. शेख विभागीय वन अधिकारी, सामाजिक वनिकरण, मुख्याधिकारी उमेश ढाकणे, शिक्षणाधिकारी, नागरिकांनी सहभाग घेतला.

पर्यावरणासाठी घ्यावा पुढाकार
बीड शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीपात्रालगत तसेच प्रकल्पाच्या खाली दहा एकरामध्ये बांबू लागवडी सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, महाविद्यालय, व्यापारी संघटना, उद्याेजकासंह वृक्षप्रेमींच्या हाताने हाेत आहेत. शहरासह जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकांनी वृ़क्षारोपण व संगोपन करावे व पर्यावरण रक्षणासाठी पुढाकार घ्यावा, हा या उपक्रमाचा उद्देश आहे.
राधाबिनाेद शर्मा, जिल्हाधिकारी.

बातम्या आणखी आहेत...