आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्याचे वाटप:देवदहिफळ येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीनिमित्त वृक्षारोपण, शालेय साहित्याचे वाटप

दिंद्रुड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

धारूर तालुक्यातील देवदहिफळ येथे अण्णा भाऊ साठे यांची जयंती वृक्षारोपण व शालेय साहित्य वाटप करून साजरी करण्यात आली. यावेळी डीपीआयचे तालुकाध्यक्ष नवनाथ कांबळे, सामाजिक कार्यकर्ते गोविंद केकान, देवदहिफळचे सरपंच श्रीधर बडे, उपसरपंच दामोदर बडे, माजी व्हाइस चेअरमन श्रीहरी बडे, दिंद्रुड कृषक सहकारी सोसायटीचे संचालक दिलीप बडे, पत्रकार नागेश वकरे, वसंत कांदे, अविनाश घायाळ, ग्रा. पं. सदस्य सुभाष कांबळे, पप्पू शेख, सोमनाथ बडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

डीपीआयचे तालुकाध्यक्ष नवनाथ कांबळे यांनी विचार मांडत असताना अण्णा भाऊ साठे यांना अभिप्रेत असणारा समाज निर्माण करण्यासाठी समाजातील सुशिक्षित तरुणांनी पुढे आले पाहिजे. त्याशिवाय महापुरुषांना अभिप्रेत असणारा समाज निर्माण होणार नाही, असे सांगितले. व्याख्याते बिभीषण बडे यांनी अण्णा भाऊ साठे यांचे गुरू डॉ. बाबासाहेब आंबेडकर, तर बाबासाहेबांचे गुरू महात्मा ज्योतिबा फुले होते.

ही महापुरुषांची परंपरा समाजामध्ये जपली गेली पाहिजे, असे मनोगत व्यक्त केले. यावेळी जयंती कमिटी अध्यक्ष सोमनाथ कांबळे, राजेभाऊ कांबळे, धुराजी कांबळे, बन्सी कांबळे, महादेव कांबळे, सुरेश कांबळे, कृष्णा कांबळे, बाबासाहेब कांबळे, शिवाजी कांबळे यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती. यापुढेही सामाजिक उपक्रम राबवत राहू, असे जयंती उत्सव समिती अध्यक्ष सोमनाथ कांबळे व सहकाऱ्यांनी याप्रंसगी सांगितले. प्रास्ताविक बळीराम कांबळे यांनी केले, तर सूत्रसंचालन गणेश कोल्हे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...