आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:वडवणी ते थेटेगव्हाण रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण

वडवणी19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वडवणी-चिंचवण-थेटे गव्हाण या १० किलो मिटर रस्त्याची दुरावस्था झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागत आहे, तर या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मणक्याचा आजार जडला. वडवणी-चिंचवण- थेटेगव्हाण या रस्त्याकडे प्रशासन का जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे.भाजपाचे मयूर बडे यांच्यासह शेकडो तरुणांनी डांबरी रस्त्यावर मोठ मोठ्या खड्ड्यात वृक्षारोपण करून अनोख्या पद्धतीने आंदोलन केले.

खामगाव-पंढरपूर हा राष्ट्रीय मार्ग दर्जेदार झाल्याने लातूर ,पंढरपूर, सह कर्नाटकात जाण्यासाठी वडवणी तालुक्यातील जनतेला जवळचा मार्ग म्हणजे चिंचवण -थेटेगव्हाण, याच मार्गावरून तालुक्यातील जनता प्रवास करीत आहे. या दहा किलोमीटर रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली.,संपूर्ण खड्डे चुकवताना वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते. रस्ता दुरुस्ती बाबत अनेक वेळा पाठपुरावा करण्यात आला. ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा देताच थातूरमातूर दुरुस्ती केली जाते. याला नागरिक कंटाळले असून वडवणी -चिंचवण-थेटेगवहाण हा रस्ता पूर्णपणे दुरुस्त करण्याबाबत भाजपाचे मयुर बडे यांनी शेकडो तरुणांना सोबत घेऊन वृक्षारोपण केले. यावरही प्रवासनाने दखल न घेतल्यास १७ सप्टेंबर रोजी मोठे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला. यावेळी विनोद तांबडे, नितीन बडे, महादेव बडे, धनंजय धायतिड, ऋषिकेश बडे, बापू अंभोरे, अखिल कुटुळे, शेख सलीम, बाळासाहेब नेटके, कृष्णा नानवर, बाबु नानवर, मेघराज बडे, दत्ता तांबडे, अमित खाडे, शेख नेता, शेख अमीर, शेख सिद्दीक, तांबडे सचिन, नितीन मुंडे, देवानंद बांगर, कृष्णा बडे, ऋषिकेश तांबडे,संकेत बडे उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...