आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वृक्षारोपण‎:नवीन वर्षानिमित्त हिरापूर‎ ग्रामपंचायतीकडून वृक्षारोपण‎

बीड‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बीड‎ तालुक्यातील हिरापूर येथील बाजार‎ तळ परीसरात नवीन वर्षाचे स्वागत‎ करताना ग्रामस्थांनी वृक्ष लागवड‎ केली. यासह बाजार तळ परिसरात‎ स्वच्छता मोहिम राबवली.‎ हिरापूर येथील ग्रामपंचायत‎ निवडणूक नुकतीच पार पडली.‎ नूतन पदाधिकाऱ्यांनी नवीन वर्षाचे‎ स्वागत करताना सामाजिक उपक्रम‎ राबवण्याचे ठरवले. त्यानुसार‎ गावातील बाजार तळ परिसरात‎ वृक्षारोपण करण्यात आले.‎

याशिवाय ग्रामस्थांनी हाती झाडू घेत‎ स्वच्छता मोहिमही राबवली.‎ यापूर्वीही ग्रामस्थांनी वृक्षरोपण‎ करून अनेक झाडांचे संवर्धन‎ केलेले आहे. यंदा लागवड‎ केलेल्या झाडांची योग्य ती निगा‎ राखण्याचा संकल्प करण्यात‎ आला. यावेळी नूतन सरपंच‎ बाबूलाल पवार, उपसरपंच अमजद‎ पठाण, सदस्य डॉ.दिनकर तिपाले,‎ संतोष काळे, रमेश पवार,‎ ग्रामसेवक घोडके कैलास, रमेश‎ कदम, भगवान सावंत, महादेव‎ पवार, लक्ष्मण कांबळे, वैजिनाथ‎ तुपे, राज तिपाले, राम काळे, राजेंद्र‎ मुंजाळ, श्रीराम तीपाले, उध्दव‎ वडमारे आदी उपस्थित होते

बातम्या आणखी आहेत...