आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सामाजिक उपक्रम:वृक्षारोपण, पर्यावरणाचा मानवी आरोग्याशी घनिष्ठ संबंध : मोरे

माजलगाव3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ त्र्यंबकेश्वर, बालसंस्कार व युवा प्रबोधन विभागाच्या वतीने १ कोटी महावृक्षारोपण व संगोपन या उपक्रमांतर्गत गुरुपुत्र नितीन मोरे यांच्या उपस्थितीत महावृक्षारोपण झाले. वृक्षाचा पर्यावरण व मानवी आरोग्याशी घनिष्ठ संबंध आहे, असे नितीन मोरे यांनी याप्रसंगी बोलताना सांगितले.

या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्ज्वलन करुन झाले. गटविकास अधिकारी हजारे यांची प्रमुख उपस्थिती होती. पुढे बोलताना मोरे म्हणाले, वृक्षलागवडीमुळे पर्यावरणाचे संरक्षण होऊन पर्जन्यमान उंचावते. त्याचा चांगला परिणाम संपूर्ण जीवसृष्टीवर होतो. वृक्षवल्ली आम्हा सोयरे या उक्तीप्रमाणे असंख्य वनस्पती या मानवी आरोग्यावर रामबाण उपाय आहेत. श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग ८० टक्के सामाजिक उपक्रम व २० टक्के अध्यात्म या तत्वाने कार्य संपुर्ण जगात करत आहे, असेही त्यांनी सांगितले. गटविकास अधिकारी हजारे यांनी श्री स्वामी समर्थ गुरुपीठाने आयोजित केलेल्या एक कोटी महावृक्षारोपण व संवर्धन या उपक्रमाचे कौतुक केले व आगामी काळात १ लाख वृक्ष या उपक्रमांसाठी उपलब्ध करुन देऊ असे सांगितले. प्रास्ताविक डॉ.यशवंत राजेभोसले यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...