आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाणसाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी निसर्गाचे आरोग्य चांगले राहणे आवश्यक आहे. हे आेळखून बीड शहरातील पर्यावरणप्रेमी महिला डॉक्टरांनी ‘झाडांची भिशी’ या उपक्रमातून मागील पाच वर्षांत दहा हजारांहून अधिक झाडांची लागवड करून त्यांचे संगोपनही केले आहे. सुरुवातीला उजाड माळराने हिरवी करणाऱ्या या डॉक्टरांनी या वर्षी शाळांमध्ये वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला आहे.
पाच वर्षांपूर्वी बीड शहरातील महिला डॉक्टरांनी एकत्रित येत ‘झाडांची भिशी’ हा उपक्रम सुरू केला आहे. सुरुवातीला आयएमएच्या वुमन विंगच्या माध्यमातून या महिला डॉक्टर एकत्रित आल्या होत्या. सातत्याने होणाऱ्या भेटी, बैठका यातून मग विविध उपक्रम त्यांनी सुरू केले. यातूनच मग पर्यावरणप्रेमी महिला डॉक्टरांनी वृक्षारोपणाची मोहीम सुरू केली आणि याला झाडांची भिशी असे नाव दिले. सध्या या भिशीच्या ग्रुपमध्ये ४० महिला डॉक्टर आहेत.
वृक्ष लागवड करण्यासाठी या महिला डॉक्टरांचा सहभाग
सुनीता बारकुल, प्रज्ञा तांबडे, रिता शहाणे, पूर्णिमा यंदे, सारिका वाघ, डिंपल ओस्तवाल, अंजली बहिर, ज्योती घुंबरे, किरण हिरवे, शीतल पानसंबळ, शीतल भोपळे, निवेदिता गायकवाड, स्वप्नजा देशमुख, जया रायमुळे, अंजली नाईकवाडे, सोनाली मुंडे, ऊर्मिला घोडके, रेश्मा चव्हाण, वर्षा तिडके, सुवर्णा जायभाये, सारिका क्षीरसागर, मोहिनी लांडगे, पूजा केदार, अश्विनी येवले, ज्योती बागलाणे, कौशल्या जाधव, सीमा जोशी, अमृता शेळके, जयश्री घुगे, प्रीती जाजू, तनुजा मस्तूद, शीतल मुंडे, शुभदा पांगरीकर, सोनम जायभाये, उषा सोनवणे, कीर्ती कुलकर्णी, उज्ज्वला वनवे, उज्ज्वला शिंदे, रेश्मा गवते यांच्यासह इतर डॉक्टरांचा यात समावेश आहे.
संगोपनासाठी सातत्य
दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. काही वर्षांत प्रचंड वृक्षतोड झाली. म्हणून वृक्षारोपण व संगोपनासाठी पुढाकार घेऊन ही भिशी सुरू केली व त्यात सातत्यही ठेवले.
-डॉ. सुनीता बारकुल, झाडांची भिशी ग्रुपमधील सदस्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.