आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवार:3 वर्षांत 2 लाख रोपांची लागवड अन् जोपासना, डोंगरमाथे हिरवाईने नटले

परळी2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • सामाजिक वनीकरण विभागाच्या पुढाकाराने परळी वनक्षेत्रात शंभर प्रजातींच्या झाडांची लागवड

पावसाळा संपला की उजाड होणारे परळीचे डोंगरमाथे सध्या हिरवाईने नटलेले अनेक ठिकाणी दिसत आहेत. सामाजिक वनीकरण विभागाने तीन वर्षापूर्वी सन २०१८ साली घनवृक्ष लागवड योजनेतून वृक्षारोपण करण्यास सुरुवात केली. रेवली येथील पहिला प्रयोग यशस्वी झाल्यानंतर तीन वर्षात दोन लाख रोपांची लागवड करुन जोपासणा केल्याने डोंगरमाथे हिरवाईने नटले आहेत. शंभर प्रजातींच्या वृक्षांची लागवड केल्याने वनसंपदेत वाढ झाली आहे.

परळीच्या डोंगरमाथ्यावरील दगड-गोट्यांनी भरलेल्या खडकाळ जमीनीवर आत्तापर्यंत फक्त पावसाळ्यात खुरटे गवत उगवायचे. त्या माळरानावर घनवृक्ष लागवड योजनेतून परळी तालुक्यात रेवली, कन्हेरवाडी व वसंतनगर येथील डोंगरमाथ्यावर तीन वर्षात तीन लाख वृक्षांची लागवड करत उत्कृष्ट संगोपन केल्याने हे डोंगरमाथे हिरवाईने नटले आहेत. देशी- विदेशी प्रजातींच्या या वृक्षवल्लीमुळे हे डोंगरमाथे पिकनिक पॉईंट बनत आहेत. प्रादेशिक वनीकरण बीड विभागाच्या विभागीय वन अधिकार्यांच्या मार्गदर्शनाखाली परळीचे वनपरिक्षक भगवान गित्ते, वनपाल राठोड, वनरक्षक बाबासाहेब नागरगोजे, प्रियंका सागड, वनरक्षक दौंड यांनी या माळरानावर हिरवाई पुरविण्याचा प्रयोग हाती घेतला.

कन्हेरवाडी शिवारातील शिवेवरचा मारुती जवळ असलेल्या डोंगरावर ६० हजार, परळी (वसंतनगर) शिवारातील फॉरेस्ट गट क्रमांक ४७८ मधील डोंगरावर आठ एकर जागेत ९० हजार तर रेवली येथे ४५ हजार वृक्षारोपण करुन शंभर टक्के जोपासणा केली आहे.यासाठी उन्हाळ्यात या जमीनीवरील दगड, धोंडे बाजुला काढून एक मीटर जमीन खोदत जून महिन्यात जमीन रोप लागवडीसाठी तयार केल्यानंतर जुलै, ऑगस्ट महिन्यात प्रति चौरस मीटरमध्ये तीन रोपे या प्रमाणे एका हेक्टरमध्ये ३० हजार रोपांची लागवड करण्यात आली. शेनखत व सेंद्रिय पदार्थांचा वापर करत रोपांचे संगोपन करण्याचे नियोजन केले. परळीच्या डोंगरमाथ्यावर लागवड केलेल्या वृक्षामध्ये कडुलिंब, वड, पिंपळ, उंबर, अवना, बेहडा, अंजीर, फणस, बाबळा, लक्ष्मीतरु, आंबा,आवळा, चिंच, सागवान, बदाम आदी १०० प्रकारच्या देशी, विदेशी वृक्षांची लागवड केलेली आहे.उत्कृष्ठ संगोपनामुळे अवघ्या एका वर्षात या ठिकाणी घनदाट जंगल पहावयास मिळत आहे.

एक लाखे रोपे सध्या तयार, त्याचीही लागवड करणार परळीचा परिसर औष्णिक वीज निर्मिती केंद्र व इतर व्यवहारामुळे राखेने व्यापलेला असल्याने या भागात वृक्षलागवडीची अधिक असल्याचे आम्हाला जाणवले. त्यामुळे आम्ही सामाजिक वनिकरन विभागाच्या वतिने वृक्षारोपण करत आहोत. सध्या आमच्याकडे १ लाख रोपे तयार असून येत्या काळात लागवड करणार आहोत, वन परिक्षक भगवान गित्ते यांनी यावेळी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...