आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झाडे जगवणार:रक्षा विसर्जित न करता आंबा, वटवृक्षाचे रोपण; जल प्रदूषण टाळण्यासाठी मेटे कुटुंबीयांचा पुढाकार, आईच्या स्मरणार्थ झाडे जगवणार!

केज4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

या राखेचे नदीत विसर्जित न करता दोन मुलांनी मातेची आठवण कायम स्मरणात राहावी म्हणून आंबा व वट वृक्षाचे रोपण करीत नवीन पायंडा पाडला. केज तालुक्यातील राजेगाव येथील जयश्री महादेव मेटे (वय ४५) यांचे १ एप्रिल रोजी आजाराने निधन झाले होते. त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तिसऱ्या दिवशी रक्षा सावडून विसर्जनाचा कार्यक्रम होता. मात्र त्यांची मुले विजय मेटे, कृष्णा मेटे यांनी राख सावडून नदीत विसर्जित करून प्रदूषण करण्याऐवजी आईची आठवण कायम स्मरणात राहावी म्हणून अंत्यविधी झालेल्या शेतात आंबा व वटवृक्षाचे रोपटे लावून रोपट्याच्या बुडाला राख विसर्जित करीत नवा पायंडा पाडला आहें

यावेळी इन्फन्ट इंडियाचे दत्ता बारगजे, विकास मिरगणे, दत्ता देशमुख, ज्योतिराम जाधव, बाबासाहेब केदार, मुरलीधर ठोंबरे, मेजर पांडुरंग राऊत, दिगंबर भूतकर, गोरख थोरात, पत्रकार गौतम बचुटे हे उपस्थित होते. स्व. जयश्री मेटे यांच्या स्मरणार्थ त्यांची रक्षा तिर्थात विसर्जित करून पाणी व पर्यावरण प्रदुषित करण्यापेक्षा एक मोठे वडाचे झाड लावून तेथे ही रक्षा विसर्जित केली. ही झाडे भविष्यात मोठी झाल्यावर दिवंगतांची जयंती, पुण्यतिथी आदी कार्यक्रम याच ठिकाणी घेता येतील. झाड मोठे झाल्यावर त्यावर पक्ष्यांचे थवे, चिवचिवाट यातून यांच्या स्मृति जाग्या करतील. हा एक आदर्श समाजाला दिशादर्शक ठरेल. पर्यावरण संवर्धन ही होईल, असे इन्फंट इंडियाचे संचालक दत्ता बारगजे यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...