आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सूचना:जिल्ह्यात १ जुलैपासून प्लास्टिक वापरास बंदी; जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन दिल्या सूचना

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एकल वापर प्लास्टिकवर १ जुलै २०२२ पासून पूर्णतः बंदी असणार आहे. यासंदर्भात जिल्ह्यामध्ये १ जुलै २०२२ रोजी मोठ्या प्रमाणात मोहीम राबवून एकल वापर प्लास्टिक जप्तीची कार्यवाही करावी. तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने जिल्ह्यामध्ये प्लास्टिक कारखान्यांवर कायद्यानुसार कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हास्तरीय टास्क फोर्सचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी दिल्या.

केंद्र शासनाच्या १२ ऑगस्ट २०२१ च्या अध्यादेशानुसार एकल वापर प्लास्टिकवर ०१ जुलै २०२२ पासून पूर्णत: बंदी घालण्याचे आदेश असून याबाबत मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी देऊन जनजागृती करावी. सर्व नगर परिषदांनी त्यांच्या कार्यालयात व सार्वजनिक ठिकाणी बॅनर्स लावावेत, असेही जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी यावेळी सूचित केले. राज्य शासनाने २६ एप्रिल २०२२ च्या आदेशान्वये जिल्हास्तरीय टास्क फोर्स गठित करण्याबाबत सूचना देण्यात आलेल्या आहेत.

त्यानुसार बीड जिल्हा टास्क फोर्सची पहिली बैठक जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली झाली त्या वेळी ते बोलत होते. यावेळी नगर परिषदांचे मुख्याधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी उपस्थित होते. प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकाऱ्यांनी सर्वांचे स्वागत केले. प्रास्ताविकामध्ये त्यांनी जिल्ह्यामध्ये प्लास्टिक बंदीबाबत सादरीकरण केले.

बातम्या आणखी आहेत...