आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कविता:सामाजिक राजकीय आशयाच्या कवितांनी रसिकांची मने जिंकली

बीड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहामध्ये कवी राम गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक कवीचे कवी संमेलन घेण्यात आले. यावेळी कवींनी आपल्या कवितेच्या माध्यमातून सामाजिक राजकीय आशयाच्या कविता सादर करून रसिकांची मन जिंकली.

यात ६० कवी सहभागी झाले. शिवाजी कायंदे,लक्ष्मीकांत दाभाडकर, डॉ.सदाशिव कमळकर, डॉ. ज्योती धर्माधिकारी, प्रदीप देशमुख,प्रदीप इक्कर, सुनील लोणकर, पांडुरंग गिराम,गणेश खरात,अशोक खेडकर, साहिल पाटील, विनोद जैतमहाल,प्रा.दिगंबर दाते, रेखा गतखने, डॉ.विद्या दिवटे,अशोक शिंदे भारत शास्त्री,दीपक राखुंडे, गणेश कंटुले, संतोष जोशी यांच्यासह अनेक कवींनी विविध विषयावर कविता सादर केल्या.श्रोत्यांनी सर्व कवींच्या कवितांना भरभरून प्रतिसाद दिला. सूत्रसंचालन सुहास पोद्दार व डॉ. राज रणधीर यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...