आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहल्ली चेष्ठायुग सुरू झालय, सारं अवघड आहे तथापी विडंबन हे वास्तवदर्शी आहे. प्रसन्न प्रहार हा साळेगावकरांच्या कणवा,कारूण्याचे दर्शक आहे. प्रभाकर हे अस्सल कवी आहे म्हणुनच ते प्रगल्भ विडंबन करू शकतात, त्यामुळे साळेगावकर हे //"जागल्या’ ची भूमिका करतात, हे खरं आहे. मला त्यांच्या विडंबनात कविता सापडते असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी अशाेक नायगावकर यांनी केले. माजलगावात ज्येष्ठ कवी प्रभाकर साळेगावकर यांच्या प्रसन्न प्रहार या विडंबन संग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ नायगावकर यांच्या हस्ते करण्यात आले.
शहरातील वैष्णवी मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार डी. के. देशमुख तर प्रमुख पाहुणे म्हणून श्रावण गिरी, भास्करराव कुलकर्णी, अशोक लवुळकर, राजेसाहेब कदम, प्रभाकर साळेगावकर, माधुरी साळेगावकर आदी उपस्थित होते. सरस्वती पूजनानंतर धनंजय जाडे, कुणाल लवुळकर यांनी मराठवाडा गीत सादर केले.
यावेळी कवी साळेगावकर यांनी अनेक विडंबनाचे भन्नाट सादरीकरण केले. यावेळी हास्य कवी अशोक नायगावकर यांनी हास्य कवितांची बॅटींग करत उपस्थितांना मनमुराद हसवले. यावेळी माजी आमदार डी. के. देशमुख म्हणाले, साळेगावकर यांच्या सामाजिक भानाचे सदैव कौतुक वाटते. नवविकास मंडळाला त्यांचा सार्थ अभिमान आहे कारण त्यांची जडणघडण माझ्या संस्थेत झाली आहे. यावेळी कार्यक्रमास मोहनराव सोळंके, अॅँड. एस. आर. शर्मा, उपविभागीय अधिकारी राजेश जोशी, सुरेश कुमार लोंढे, अॅड. सुलभा देशमुख, अच्युतराव लाटे, अरुण राऊत, दत्ता महाजन, विलास कुलकर्णी, गौरी देशमुख, पि. आय. शीतलकुमार बल्लाळ, संतोष मुळी, अंजी राम भोसले, रंगनाथ सावंत, मुकूंद सोळंके, रत्नाकर चौकीदार, प्रशांत भानप, अरुण पवार, मोहीब कादरी, श्रीकांत कुलकर्णी, सुरेश बजाज, संजय चिटणीस, विजय देशपांडे, अॅड. भिलेगावकर, र. ब. देशमुख, भिकचंदजी दुगड, अमरनाथ खुर्पे, पुष्कर कदम आदी उपस्थित होते. यावेळी दिगंबर महाजन, डाॅ. स्वानंद कुलकर्णी, संजय कोकड, प्रवीण काळे, सचिन ब्रम्हगावकर, जगदिश साखरे, हिमांशु देशमुख यांनी परिश्रम घेतले. सुत्र संचलन कवी राजेसाहेब कदम, प्रास्तविक प्रा. स्नेहल पाठक तर गझलकार दिवाकर जोशी यांनी आभार मानले. महाराष्ट्रगीताने सांगता झाली.
माझा नको, गर्दीचा फोटो पेपरात छापा
यावेळी कार्यक्रमात बोलतांना ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर हे उठले असता फोटो ग्राफरकडे पाहुन नायगावकर यांनी माझा नको या गर्दीचा फोटो पेपरात छापा असे सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला. यावेळी सुरेश देशपांडे यांनी काढलेली रांगोळी लक्षवेधी ठरली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.