आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तहसीलदारांच्या दालनात विष प्राषण:आष्टीत तहसीलदारांच्या कक्षामध्ये घेतले विष, फेर रद्द होत नसल्याने पाऊल, महिला रुग्णालयात

आष्टी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तलाठी, मंडळ अधिकारी फेर रद्द करत नाहीत, कोर्टाने आपल्या बाजूने निकाल देऊनही तहसीलदारांनी नोटीस बजावल्याने संतप्त महिलेने तहसीलदारांच्या दालनात विष घेतल्याची घटना मंगळवारी दुपारी सव्वातीन वाजता आष्टीत घडली. आशाबाई संतोष शिंदे (५२, रा. पिंपळा) असे विष घेणाऱ्या महिलेचे नाव असून त्यांना आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

आशाबाई यांची पिंपळा येथे सर्व्हे नंबर २९३ मध्ये १ हेक्टर व २९४ मधील क्षेत्र ०.८० हेक्टर आर अशा एकूण साडेचार एकर जमिनीच्या वादासंदर्भात औरंगाबाद येथील अपर विभागीय आयुक्त कार्यालय यांच्या आदेशानंतर फेर रद्द करण्यासाठी आशाबाईंनी पुनर्विलोकनासाठी अर्ज दाखल केला होता. यानंतर अपर आयुक्तांनी ३ डिसेंबर २०२१ रोजी महिलेच्या बाजूने निकाल दिला. पुनर्विलोकनासाठीचा अर्ज अपर आयुक्तांनी मान्य केला. बीडचे अपर जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश कायम करण्यात येत असल्याचा निकाल दिला गेला. त्यामुळे आशाबाई यांचा फेर मंजूर करण्यात येत असल्याचा निर्णय देण्यात आला. परंतु फेरची नोंद तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी घेतली नव्हती.

बातम्या आणखी आहेत...