आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बीड:विष घेतलेल्या पत्नीचा मृत्यू, पतीचीही तासाभरात गळफास घेऊन आत्महत्या; परळीजवळील पांगरी कॅम्प येथील घटना

परळी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 7 महिन्यांपूर्वीच झाला होता विवाह, कुरबुरी होऊ लागल्याने पत्नीने उचलले टोकाचे पाऊल

पाच महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या विवाहितेने मंगळवारी राहत्या घरी कीटकनाशक प्राशन केले. रात्री साडेनऊ वाजता तिचा मृत्यू झाला. पत्नीचा मृत्यू झाल्याचे कळताच पतीनेही मामाच्या घरी रात्री ११ वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली. परळी येथील पांगरी कॅम्प येथे ही घटना घडली. दोघांच्या आत्महत्येचे कारण अद्याप समोर आले नसून पोलिस तपास करत आहेत.

जेसीबी ऑपरेटर सायस विलास पंडित (२४) याचे ९ जून २०२० ला तळेगाव येथील प्रियंकाशी लग्न झाले होते. मात्र दोनच महिन्यांत त्यांच्यात कुरबुरी होऊ लागल्या होत्या. प्रियंकाने मंगळवारी घरातच कीटकनाशक प्राशन केले. प्रकृती बिघडल्याने नातलगांनी प्रियंकाला रात्री ८ वाजता परळीच्या खासगी दवाखान्यात दाखल केले. परंतु रात्री ९.३० च्या सुमारास तिचा मृत्यू झाला. नातेवाइकांनी प्रियंकाचा मृतदेह तळेगावात आणला. पत्नीचा मृत्यू झाल्याचे कळताच सायसने पांगरीला शेजारी राहत असलेले मामा रावसाहेब गोविंद पाचांगे यांच्या घरातील आडूला गळफास घेऊन आत्महत्या केली. मध्यरात्रीनंतर ही घटना उघडकीस आली.

परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद

प्रियंका व सायस यांच्या मृतदेहांचे बुधवारी परळी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन झाले. याप्रकरणी परळी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली आहे. प्रियंकाच्या मृत्यूबद्दल नातलग सासरच्या लोकांविरुद्ध रोष व्यक्त करत होते. याबाबत तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser