आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:बीडमध्ये दहावीच्या विद्यार्थिनीने घेतला गळफास, आत्महत्या की घातपात याचा पोलिसांकडून तपास

बीड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिक्षणासाठी मामाकडे राहत असलेल्या दहावीच्या विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बीड शहरातील छत्रपती कॉलनीत घडली आहे. सृष्टी रोहिदास काळे (१६) असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून तिचे दहावीचे तीन पेपर शिल्लक होते.

बीड शहरातील छत्रपती कॉलनीत मामाकडे राहत असलेली सृष्टी काळे ही मुलगी सध्या दहावीची परीक्षा देत होती. तिचे आणखी तीन पेपर शिल्लक होते. २८ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास घरातील पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सृष्टीचा मृतदेह आढळून आला. नातेवाइकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर शिवाजीनगर पोलिस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी मृतदेह खाली घेऊन तो उत्तरीय तपासणीसाठी बीड जिल्हा रुग्णालयात पाठवला. सदरील घटना आत्महत्या की घातपात याचा तपास पोलिस करत आहेत. दरम्यान, सृष्टीच्या आईचा काही वर्षांपूर्वी मृत्यू झालेला होता. मुलीने नेमकी आत्महत्या कशामुळे केली हे सध्या तरी स्पष्ट होत नाही, असे शिवाजीनगर ठाण्याचे पोलिस निरीक्षक केतन राठोड यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...