आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरोपी:वडवाडी दरोडाप्रकरणी आरोपींच्या पोलिस कोठडीत 5 दिवसांची वाढ

बीड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील वडवाडी येथील प्रगतिशील शेतकरी अभिमान अवचर यांच्या घरावरील दरोडा प्रकरणात अटक चार जणांच्या पोलिस कोठडीत गुरुवारी न्यायालयाने आणखी पाच दिवसांची वाढ केली. नेकनूर ठाण्याचे एपीआय मुस्तफा शेख यांनी याबाबत माहिती दिली.

वडवाडी येथे अभिमान अवचर यांच्या घरावर ४ ऑगस्ट रोजी आठ ते नऊ जणांनी सशस्त्र दरोडा टाकला होता. १० लाखांचा ऐवज यात लंपास केला गेला होता. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने दत्ता रमेश शिंदे, आकाश बापू काळे, बलभीम बाबू काळे व अनिल ऊर्फ राहुल अंकुश शिंदे या चार जणांना मोठ्या शिताफीने अटक केली होती. सुरुवातीला न्यायालयाने आरोपींना सात दिवसांची पोलिस कोठडी दिली होती. गुरुवारी याची मुदत संपत असल्याने चारही जणांना पुन्हा न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने चारही जणांना आणखी पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

साडेतीन लाखांची रिकव्हरी
दरम्यान, पोलिसांनी अटक आरोपींकडून आतापर्यंत साडेतीन लाख रुपये रिकव्हर केले आहेत. अजून रिकव्हरी सुरूच आहे. तर, गुन्ह्यात वापरलेली कटावणी, मारतूल, जॅकेटही जप्त केले आहे. फरार आरोपींचाही शोध नेकनूर पोलिस व स्थानिक गुन्हे शाखा घेत आहे.

बातम्या आणखी आहेत...