आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासहायक पोलीस अधीक्षक डॉ.धिरज कुमार यांच्या पथकाने तालुक्यातील घाटनांदुर येथे अवैध व बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा मारून ९४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई घाटनांदूरहून नबाबवाडीकडे जाणाऱ्या रोडवरील पृथ्वीराज बीअरबारच्या पहिल्या मजल्यावर ६ जानेवारी २०२३ रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या दरम्यान करण्यात आली.
छाप्यामध्ये कल्याण मटका व मिलन नाईट मटक्याचे आकडे घेणेकामी वापरण्यात आलेले लॅपटॉप, दोन प्रिंटर, १६ मोबाईल, मटक्याचे आकड्याचे वगेवगेळे १२ चिटबुक असा एकूण ९३ हजार ५०० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी युवराज नागनाथ काळे, खयुम मौलासाब कुरेशी, गोवर्धन जनार्धन मिसाळ व मुख्य सुत्रधार बाळासाहेब बापुराव देशमुख यांच्या विरूध्द सहायक पोलीस उपनिरीक्षक बालासाहेब फड यांच्या फिर्यादीनुसार अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला. पोलिस उपनिरीक्षक थोटे, फड, दशरथ मुंडे, अशोक खेलबुडे, सतेश कागणे, तोटेवाड, नामदास, गायकवाड, ठेंगळ यांनी ही कारवाई पार पाडली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.