आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कत्तलखा:कत्तलखान्यावर पोलिसांचा छापा; 66 जनावरे ताब्यात

अंबाजोगाई22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील बाराभाई गल्लीमध्ये नगरपालिकेच्या गाळ्यात कत्तल करण्यासाठी आणलेले ९ लाख रुपये किमतीचे ६६ गो वंशीय जनावरे अंबाजोगाई पोलिसांनी छापा मारुन ताब्यात घेतली. ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या मार्गदर्शनानुसार गुरुवारी रात्री करण्यात आली. याप्रकरणात सहा आरोपींविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.

फय्याज अब्दुल करीम कुरेशी व अमीर मौला कुरेशी दोन्ही (रा.बाराभाई गल्ली) या दोन आरोपींना ताब्यात घेतले असून लायक कुरेशी ,मुक्तार कुरेशी ,फारुक कुरेशी (सर्व रा. बाराभाई गल्ली) व दिशान हाफीज (रा. सदर बाजार) हे चार आरोपी फरार आहेत. पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे, पोलिस उपनिरीक्षक विठ्ठल केंद्रे, तिडके, अनिल दौड, तानाजी तागड, देवकते, सुरवसे, राठोड, गायकवाड, दंगल नियंत्रण पथक आर.सी.पी. चे दहा पोलिस अंमलदार असे पंचासह बाराभाई गल्लीतील कत्तलखान्यावर जाऊन यांनी छापा मारला. ताब्यात घेण्यात आलेली ६६ गोवंशीय जनावरे वरवटी येथील गोशाळेत पाठवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...