आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छापा‎:राडी तांडा, पिंपळा, पुससह पट्टीवडगावात‎ दारू अड्ड्यावर पोलिसांनी टाकला छापा‎

अंबाजागेाई‎4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबाजागेाई‎ तालुक्यातील राडी तांडा व धायगुडे‎ पिंपळा, पुस व पट्टीवडगाव येथे अवैध व ‎बेकायदेशीरित्या सुरू असलेल्या गावठी ‎दारू अड्ड्यावर ग्रामीण पोलिसांनी व‎ बर्दापूर पोलिसांनी छापा मारून सहा आरोपींविरुद्ध कारवाई केली.‎ रुक्मीनबाई अंबादास आडे, कल्याण‎ रंगनाथ आडे, बाबासाहेब शिवाजी‎ साबळे, सद्दाम नजरोद्दीन मिरजादे असे‎ राडी तांडा येथे केलेल्या कारवाईतील आरोपींची नावे आहेत. राडी तांडा आणि धायगुडे पिंपळा येथे बेकायदेशीर सुरू ‎असलेल्या गावठी हातभट्टी दारू‎ अड्ड्यांची माहिती मिळाल्यानंतर ग्रामीण ‎पोलिसांनी छापा मारून ३८ हजार रुपय‎ किमतीची गावठी दारू नष्ट केली.

ही कारवाई पोलिस निरीक्षक शेषराव उदार‎ यांच्या मार्गदर्शनानुसार झाली.‎ त्याचप्रमाणे तालुक्यातील पूस आणि पट्टी‎ वडगाव येथे बेकायदेशीर रित्या व‎ विनापरवाना देशी दारूची विक्री करत‎ असल्याच्या कारणावरून बर्दापूर पोलीस‎ ठाण्याचे पोलिस निरीक्षक अशोक खरात‎ यांच्या मार्गदर्शनानुसार कारवाई करण्यात‎ आली. एकूण पाच हजार रुपयांचा‎ मुद्देमाल जप्त करण्यात आला. सोमनाथ‎ फड, शेषाबाई उदार, वेणुबाई उदार असे‎ आरोपींची नावे आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...