आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठिकाणी छापे:पोलिसांचे दोन ठिकाणी छापे; केजला 37 हजारांची दारू जप्त, 5 जणांवर गुन्हे

केज10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोलिस अधीक्षकांच्या आदेशावरून सपाेनि विलास हजारेंच्या पथकाने माळेवाडी व दैठणा (ता. केज) येथे छापे मारून ३७ हजार ९०५ रुपयांची देशी-विदेशी दारू पकडली. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध केज पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. माळेवाडी व दैठणा येथे दारूचा अवैधरीत्या साठा करून ठेवल्याच्या मिळालेल्या माहितीवरून एसपी नंदकुमार ठाकूर यांनी कारवाईचे आदेश दिले होते.

त्यानुसार पोलिस अधीक्षक कार्यालयातील जनसंपर्क अधिकारी सपोनि विलास हजारे व त्यांच्या पथकाने ६ ऑगष्ट रोजी सायंकाळी ५.३० ते ८ वाजेदरम्यान दोन्ही गावांत तीन ठिकाणी छापे टाकले. या वेळी पथकाने ३७ हजार ९०५ रुपयांचा देशी-विदेशी दारूचा साठा जप्त केला. याप्रकरणी विजय नरहरी कातमांडे (रा. दैठणा), विकास नारायण जाधवर, उमेश नारायण जाधवर (दोघे रा. माळेवाडी), कल्याण गुलाब गिरी, विष्णू मारुती शिंदे या पाच जणांविरुद्ध केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.