आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मालमत्ता:बोगस पीआर कार्डद्वारे पोलिसाने‎ घेतला मालमत्तेवर ताबा‎

जालना‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बोगस पीआर कार्डद्वारे भाजप पदाधिकारी‎ सुनील राठी यांच्या लक्कडकोटमधील‎ मार्बल दुकानावर एका निलंबित पोलिस‎ कर्मचाऱ्याने ताबा घेतला आहे. याप्रकरणी‎ जवळपास २५० व्यापाऱ्यांनी शनिवारी‎ आमदार कैलास गोरंट्याल यांच्या‎ नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी आणि पोलिस‎ अधीक्षक कार्यालयात धाव घेतली.‎ जिल्हाधिकारी येथे उपलब्ध नसल्याने‎ पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे यांना‎ निवेदन देऊन या प्रकरणाची माहिती दिली.‎ संभाजीनगर प्रभागातील रहिवासी सुनील‎ मोहनलाल राठी व त्यांच्या भावाची नगर‎ परिषद जालनाच्या अधिकारक्षेत्रात‎ मालमत्ता आहे.

याच ठिकाणी त्यांचे‎ मार्बलचे दुकान आहे. सुनील राठी हे ३‎ नोव्हेंबर २०२२ रोजी रोजी दुकान बंद करून‎ घरी गेले.‎ त्यानंतर येथे एका पोलिसाने दुकानाचे कुलूप‎ तोडून स्वतःचा बोर्ड लावला. त्यामुळे या‎ आरोपीवर कारवाईची मागणी या निवेदनात‎ करण्यात आली आहे.‎ याप्रकरणाची तत्काळ दखल घेण्याची‎ मागणी यावेळी आमदार गोरंट्याल यांनी‎ जिल्हा प्रशासन व पोलिलसांकडे केली‎ आहे. आमदार गोरंट्याल यांनी तक्रार‎ केल्यामुळे आता नागरीकांचे लक्ष‎ प्रशासनाच्या भुमिकेकडे लागले आहे.‎

बातम्या आणखी आहेत...