आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागा रिक्तच:पॉलिटेक्निक : शासकीयच्या 10% तर खासगीतील 50% जागा रिक्तच

बीड/औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

पॉलिटेक्निक प्रथम वर्ष अभ्यासक्रमांच्या प्रवेशाची दुसऱ्या फेरीचे ऑप्शन फाॅर्म भरून घेण्यास १ सप्टेंबरपासून सुरुवात झाली. यात विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीची शाखा व महाविद्यालय निवडण्याची मुभा देण्यात आली.

मराठवाड्यातील १० शासकीय व ४७ खासगी पाॅलिटेक्निक काॅलेजमध्ये १५ हजार ४० जागा आहेत. पहिल्या प्रवेशफेरीसाठीची प्रक्रिया ३१ ऑगस्ट रोजी पूर्ण झाली. ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या फेरीतील जागा आरक्षित ठेवत दुसऱ्या फेरीत सहभाग नोंदण्यासाठी पर्याय निवडला होता त्यांना १ सप्टेंबरपासून ऑप्शन फॉर्म भरण्यासाठीची सुरुवात झाली. पहिल्या फेरीत २१,६३४ पैकी १७,४७० विद्यार्थ्यांनी ऑप्शन फार्म भरले. अलाॅटमेंट लाॅगीनमधून स्विकारून प्रवेश निश्चितीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत देण्यात आली होती.

ही मुदत संपल्यानंतर आता दुसऱ्या फेरीसाठीची प्रक्रिया ही सुरु करण्यात आली आहे. या पहिल्या फेरीनंतर शासकीय महाविद्यालयांमधील १० टक्के तर खासगी महाविद्यालयातील ५० टक्के जागा अजून रिक्तच आहेत. मात्र उर्वरित फेऱ्यांमध्ये सर्व जागा भरल्या जातील, अशी माहिती प्रवेश समन्वयक डॉ. एच.आर. शेख आणि प्राचार्या डॉ. माधुरी गणोरकर यांनी दिली.

असे आहे पुढील वेळापत्रक
दुसऱ्या फेरीसाठी रिक्त जागांची यादी जाहिर करण्यात आली आहे. त्यांना ४ सप्टेंबरपर्यंत ऑप्शन फाॅर्मची मुदत आहे. दुसऱ्या फेरीची अलाॅटमेंट लिस्ट ६ सप्टेंबर रोजी जाहीर होईल. ७ ते १० सप्टेंबर अलाॅटमेंट निश्चिती, तर १७ सप्टेंबर प्रत्यक्ष प्रवेश निश्चिती होईल.
तिसऱ्या फेरीसाठी रिक्त जागा १२ सप्टेंबर रोजी जाहीर होतील. याच दिवशी पाॅलीटेक्निकचे वर्ग सुरू होणार आहेत.
१३ ते १५ सप्टेंबर दरम्यान तिसऱ्या फेरीसाठी ऑप्शन फॉर्म भरणे, १८ ते २२ दरम्यान प्रवेश निश्चिती होईल. २२ ते २९ सप्टेंबरदरम्यान संस्थास्तरावर प्रवेश दिले जाणार आहेत.

१७ आयटीआयतील ९८० रिक्त जागा समुपदेशन प्रक्रियेतून
औरंगाबाद जिल्ह्यातील १७ आयटीआयमध्ये केंद्रीय प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. चाैथ्या फेरीअखेर आतापर्यंत १५७६ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून अजूनही ९८० जागा रिक्त आहेत. शासकीय आयटीआयमध्ये ६८.०४ टक्के तर खासगीत केवळ ३३.४७ टक्के प्रवेश झाले. उर्वरित जागा संस्था स्तरावर समुपदेशन फेरीद्वारे भरण्यात येतील. त्याचा तपशील संकेतस्थळावर जाहीर करण्यात आला आहे.

जिल्ह्यात ११ शासकीय आयटीआय असून त्यात २ हजार ८४ जागा आहेत. सहा खासगी आयटीआय असून त्यात ४७२ अशा एकूण २५५६ जागा आहेत. औरंगाबादच्या आयटीआयमध्ये ३० ट्रेड आणि ५२ युनिटमध्ये ११२५ जागा आहेत. त्यापैकी ७३० (६६.१२ टक्के) जागा भरल्या गेल्या असून, ३७४ पदे रिक्त आहेत. रिक्त जागांवर समुपदेशन फेरीसाठी विद्यार्थ्यांनी आपल्या लाॅगिनमधून नोंदणी करावी.

२ सप्टेंबर रोजी प्रवेशासाठीच्या जागांचे वाटप झाले. ५ सप्टेंबरपर्यंत या विद्यार्थ्यांनी सर्व मूळ प्रमाणपत्रांसह प्रवेशासाठी प्रत्यक्ष हजर राहायचे आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...