आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण:समाजात हाेणारी आमची बदनामी थांबवा; वडील लहू चव्हाण यांचे आवाहन

बीड10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राजकारणी मंडळींनी आमची बदनामी थांबवावी, पुजाच्या वडिलांची मागणी

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण राज्यभर गाजत आहे. यामध्ये एका मंत्र्याचे नाव आल्याने व काही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने मोठा गदारोळ माजला आहे. पूजाच्या आत्महत्येस मंत्रीच जबाबदार असल्याचा आरोप करत भाजपने सत्ताधाऱ्यांवर टीका सुरू केली आहे बंजारा समाजातही या प्रकरणात दोन गट आहेत. रविवारी तिचे वडील लहू चव्हाण यांनी माध्यमांसमाेर येऊन बदनामी थांबवण्याचे आवाहन केले.

घटनेनंतर पूजाचे कुटुंबीय माध्यमांंपासून दूर होते. परळीच्या नेहरु चौक परिसरातील त्यांचे घर बंद होते. रविवारी पूजाचे वडील लहू चव्हाण माध्यमांसमोर आले. मला सहा मुली आहेत. पैकी चार मुलींची लग्ने झाली असून पूजा व लहान बहिणी अविवाहित होत्या. पूजा मुलगी नव्हे तर माझ्यासाठी मुलगा होती. तिने स्वत:च्या नावावर लाखाे रुपयांचे कर्ज काढून पोल्ट्री सुरु केली होती. मात्र आधी कोरोना व नंतर बर्ड फ्लूमुळे मोठे नुकसान झाले. यामुळे ती चिंतेत होती, आजारी होती. दोन महिन्यांपूर्वीच पूजा पुण्याला गेली होती. मी तिला यासाठी २५ हजार रुपयेही दिले. ६ फेब्रुवारी रोजी पूजाशी बोलणे झाले होते. मात्र दुपारी १ वाजता ती गॅलरीतून पडली असून तातडीने या असा तिच्यासोबत राहणाऱ्या मुलांचा फोन आला. ती कशी पडली याबाबत मला माहिती नाही, ती आजारी होती का, तिला चक्कर आली हे मी काहीच सांगू शकत नाही. मात्र, पूजाच्या मृत्यूनंतर ज्या प्रकारे माध्यमांमधून चर्चा केली जात आहे, तिच्याबाबत उलटसुलट बोलले जात आहे. माझी कुणाबाबत तक्रार नाही. समाजात आमची बदनामी सुरू आहे, राजकारणी मंडळींनी आमची बदनामी थांबवावी अशी मागणी करताना लहू चव्हाण यांना अश्रू अनावर झाले होते. विनाकारण सुरू असलेल्या बदनामीमुळे आमच्या कुटुंबाला प्रचंड त्रास होत असून आता यावर पूर्णविराम लागायला हवा, असेही ते माध्यमांशी बोलताना म्हणाले.