आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्र:पाटोदा-अहमदपूर मार्गाचे काम निकृष्ट; मुंदडांचे गडकरींना पत्र

अंबाजोगाई21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाटोदा-अहमदपूर राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ट कामाची तत्काळ चौकशी करून मुदतीत कामे पूर्ण केली नसल्याच्या कारणावरून एचपीएम कंपनीविरुद्ध योग्य कार्यवाही करून रस्त्याचे काम तत्काळ सुरू करावे, अशी मागणी आमदार नमिता मुंदडा यांनी परिवहन व रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. बीड जिल्ह्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्र ५४८-डी पाटोदा ते अहमदपूर या रस्त्याच्या कामाला कोरोनामुळे वाढऊन दिलेली मुदत संपली तरीही अंबाजोगाई, केज, नेकनूर शहरातील रस्त्यांची कामे अद्याप अपूर्ण आहे. सदर रस्त्याचे काम अत्यंत संथ गतीने चालू आहे.

या मार्गावर काम रखडल्यामुळे दोन वर्षात तब्बल ३० पेक्षा जास्त नागरिकांचे बळी गेले आहेत.जवळपास ८७ ९ कोटी रुपये खर्चाचा हा रस्ता सध्या मृत्यू मार्ग बनला आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने सदर रस्त्याचे चुंबळी ते मांजरसुंभा, मांजरसुंभा ते धायगुडा पिंपळा व धायगुडा पिंपळा ते अहमदपूर, असे तीन टप्पे करून वेगवेगळ्या कंपन्यांना काम दिले आहे.आत्तापर्यंत केवळ चुंबळी ते मांजरसुंभा पर्यंतच काम झाले आहे. परंतु मांजरसुंभा ते धायगुडा पिंपळा दरम्यान ठीक ठिकाणी रस्त्यांचे, पूल, नाल्या, रिंगरोडचे कामे अद्याप बाकी आहे. अंबाजोगाई जवळील चनई पाटी जवळ रस्ता एका साईडला दबून मधून भेगा पडल्या आहेत. केज,अंबाजोगाई व नेकनूर शहरामध्ये रस्ता खोदून ठेवला आहे.

त्यामुळे प्रचंड प्रमाणात धूळ होत असून नागरिकांना श्वसनाचे विकार होत आहेत. यंत्रसामुग्री जागेवर उभी आहे. काम बंद असल्यामुळे वाहनधारकास व नागरिकांना त्रास होत आहे. तीन्ही शहरातील वाहतूक अर्धा अर्धा तास ठप्प होत आहे. त्यामुळे त्याठिकाणी सतत अपघात होत असून सामन्य नागरिकांचे जीव जात आहेत. त्या अनुशंगाने सदर रस्त्याबाबत आमदार नमीता मुंदडा यांनी नागरिकांच्या व वाहनधारकांच्या तक्रारीची दखल घेऊन २ मे २०२२ रोजी एचपीएम कंपनीचे डायरेक्टर व एमएसआरडीसी च्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यांना कामाची गती वाढवण्यासाठी व कामाचा दर्जा राखण्यासाठी सूचना दिल्या

पावसाळा आणि जंपिंग रस्त्यामुळे वाढले अपघाताचे प्रमाण
रस्त्यावर जागोजागी जंपिंग असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. पावसाळा सुरु असल्याने खोदुन ठेवलेल्या रस्त्यावर पाणी साचून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. कामाच्या गुणवत्तेची तत्काळ चौकशी करून एचपीएम कंपनीचे डायरेक्टर यांनी लेखी देऊनही मुदतीत कामे पूर्ण केली नाहीत त्यामुळे कंपनीवर त्वरित कार्यवाही करून रस्त्याचे काम सुरु करण्याबाबत आदेश द्यावेत असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

एचपीएमची हमी हवेत
एचपीएम कंपनीचे डायरेक्टर व एमएसआरडीसी अधिकाऱ्यांनी कामे एक महिन्याच्या आत करु अन्यथा कंपनीवर कार्यवाही करण्याबाबत लेखी हमी दिलेली आहे. परंतु एचपीएम कंपनीने लेखी देऊनही त्यामध्ये कोणत्याही प्रकारची सुधारणा झाली नाही. सर्व कामे अपूर्ण व बंद आहेत.

बातम्या आणखी आहेत...