आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रकरण:हवालामार्फत मागवली पोर्टेबल सोनोग्राफी मशीन; गर्भलिंग निदान प्रकरण

बीड14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गर्भलिंग निदान प्रकरणात अटक केलेल्या शिकाऊ डॉक्टरकडून पोलिसांनी गर्भलिंग निदानासाठी वापरली जाणारी पोर्टेबल सोनोग्राफी मशीन जप्त केली. दरम्यान, प्रत्येक सोनोग्राफी मशीनची कंपनी किंवा आरोग्य विभागाकडे नोंद असते. मात्र, या डॉक्टरकडून जप्त केलेल्या मशीनची कुठेच नोंद नाही. ही चायना मेड मशीन असून हवालामार्फत ही मशीन मागवल्याची पोलिसांना शंका आहे. त्या दिशेने तपास सुरू आहे.

ज्या पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या सहाय्याने सतीश हा मनिषाच्या घरी येऊन गर्भलिंग निदान करत होता ती मशीन मंगळवारी पोलिसांनी औरंगाबाद येथून सतीशच्या घरून जप्त केली. आता ही मशीन त्याच्याकडे कुठून आली याचा शोध पोलिस घेत आहेत. चायना मेड मशीनची कुठेच नोंद नसल्याने हवालामार्फत ही मशीन मागवल्याची प्रथमदर्शनी शंका असून त्या दृष्टीने पोलिस तपास करताहेत.

डॉ. गवारेची मशीन ?
सतीश सोनवणे हा जालन्याच्या डॉ. सतीश गवारेकडे गर्भलिंग निदान शिकला होता. गवारे हा मनीषा सानपकडे येत होता. त्यामुळे, ही सोनोग्राफी मशीनही गवारेच्या माध्यमातून घेतली असू शकते किंवा गवारे याचीच ही मशीन असू शकते. त्यामुळे त्या अनुषंगानेही पोलिस तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...