आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापत्रकारिता करताना केवळ नकारात्मक बाबी दाखवण्यापेक्षा समाजात, जिल्ह्यात जे काही चांगले घडते आहे ते दाखवणे ही आवश्यक असल्याचे प्रतिपादन माजी प्राचार्य डाॅ. दीपा क्षीरसागर यांनी केले. शहरातील अन्विता हॉटेलच्या सभागृहात रविवारी झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ रंगकर्मी कुलदीप धुमाळे यांना सद्भावना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी त्यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला.
यावेळी अध्यक्षस्थानावरून डॉ. क्षीरसागर बोलत होत्या. व्यासपीठावर पत्रकार सुशील कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थितीहोती. यावेळी बोलताना डॉ.दीपा क्षीरसागर म्हणाल्या, शहरातील स्व.राधेश्याम मुंदडा यांच्या स्मृती निमित्त सद्भावना मित्र परिवाराच्या वतीने पहिल्या सद्भावना पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.मित्र परिवाराने केलेला सन्मान हा मनाला उभारी देणारा, प्रेरणा देणारा आहे.समाजकारण, राजकारण करत असताना पत्रकारांची भूमिका महत्त्वाची असते, सकारात्मक मांडणी कमी आणि नकारात्मक मांडणी अधिक दिसू लागली आहे.
समाजाच्या हिताचे प्रश्न मांडणे जितके महत्वाचे तितके समाजासाठी केलेले कार्य देखील समोर आले पाहिजे. राजकारणी म्हणून सतत त्याच त्या गोष्टी पेक्षा नवीन काही तरी अपेक्षित आहे. कुलदीप धुमाळे यांनी आयुष्यभर सकारात्मकता ठेवली, माणूस जोडण्याचे काम त्यांनी केले. कला, साहित्य याद्वारे समाजप्रबोधन करण्याचा प्रयत्न केला, आपल्या मित्राच्या स्मृतिप्रीत्यर्थ सद्भावना पुरस्कार देऊन गौरव करावा ही बाब नक्कीच कौतुकास्पद आहे.
या प्रसंगी सद्भावना मंडळाचे अध्यक्ष वाय.जनार्धन राव, रोटरीचे अध्यक्ष कल्याण कुलकर्णी, सचिव विकास उमापुरकर, प्रोजेक्ट चेअरमन अमर डागा, नितीन कोटेचा, किशोर बाहेती, गोविंद कासट, पत्रकार महेश वाघमारे, प्रशांत सुलाखे, गायक भरत लोळगे, मंगेश लोळगे, अशोक मंत्री, प्रशांत पवळ, तुकाराम वायभट, अभय कोटेचा, कमलेश मुंदडा, निलेश, शैलेश, सूरज लाहोटी राम मोटवाणी, पुसाराम लददड, प्रा.रत्नाकर क्षीरसागर आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्र संचालन राजेंद्र मुनोत यांनी केले तर विश्वनाथ माणुसमारे यांनी आभार मानले.
माध्यमांनी जिल्ह्याची बदनामी करू नये : कुलकर्णीयावेळी सुशील कुलकर्णी यांनीही बीड जिल्ह्याच्या बाबतीत विविध विषयांवर भाष्य करून जिल्ह्यात काहीतरी चांगले घडते याकडे पाहिले पाहिजे. मीडियाने देखील जिल्ह्याची बदनामी होईल असे कुठलेही वृत्त प्रकाशित करताना विचार केला पाहिजे, घडते एकीकडे आणि बदनामी बीड जिल्ह्याची का? असे सांगून त्यांनी प्रत्येकाने प्रत्येकाबद्दल सदभावना ठेवूनच वागावे असे सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.