आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ध्वजारोहण:केएसके महाविद्यालयात केले विद्यार्थ्यांच्या पोस्टरचे अनावरण

बीड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड येथील के.एस.के.महाविद्यालयाच्या प्रांगणात नवगण शिक्षण संस्थेचे सचिव डॉ.भारतभूषण क्षीरसागर यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने सुशांत खंदारे याची एनसीसी राज्य निवड प्रक्रियेत कॅडेट अहमदनगर येथे निवड झाल्या बद्दल सम्मान चिन्ह लावण्यात आले. महाविद्यालयाच्या विविध विभागातंर्गत भित्ती पत्रकाचे प्रकाशन झाले.त्यात गृहविज्ञानशास्त्र, नाट्यशास्त्र, हॉस्पीटल मॅनेजमेंट, संगीत विभाग, प्राणीशास्त्र विभाग, अर्थशास्त्र विभाग, गणित, संगणकशास्त्र, सुक्ष्मजीवशास्त्र, समाजशास्त्र, मराठी, रसायनशास्त्र,भौतिकशास्त्र, वनस्पतीशास्त्र, हिंदी विभाग, इतिहास, राज्यशास्त्र, ऊर्दू, इंग्रजी व वाणिज्य विभागाच्या वतीने भित्तीपत्रकाचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमास प्राचार्य डॉ.दीपा क्षीरसागर, डॉ.आर.जी.मचाले,प्रभारी प्राचार्य डॉ.शिवानंद क्षीरसागर, पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ.सतीश माऊलगे, कमवि उपप्राचार्य सय्यद एल.एन., पर्यवेक्षक जालिंदर कोळेकर,एनसीसी कॅप्टन डॉ.बी.टी. पोटे व एनसीसी कॅडेट,राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, कार्यक्रमाधिकारी डॉ.खाकरे पंडित,कार्यालयीन अधिक्षक डॉ.विश्वांभर देशमाने तसेच डॉ.अरूण भस्मे, डॉ.आर.टी.गर्जे, नगरसेवक विनोद मुळूक तसेच महाविद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थनी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...