आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुव्य मराठी विशेष:महाराष्ट्राच्या लोककलेतील मुकुट म्हणजे पोवाडा; शिवशाहीर संतोष साळुंके यांचे प्रतिपादन

दिंद्रुड2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक

पूर्वीच्या काळी समाजमाध्यमे नव्हती. कोणत्याही आधुनिक सुविधा नव्हत्या. संत ज्ञानेश्वरांच्या, तुकोबाराय, शिवाजी महाराजांच्या काळात त्या काळी पानापानांवर इतिहास रचलेला आहे. हा इतिहास पोवाड्याच्या माध्यमातून शाहीर समाजासमोर मांडतो. एवढेच नव्हे तर महाराष्ट्राच्या लोककलेतील मुकुट म्हणजे पोवाडा आहे, असे प्रतिपादन शिवशाहीर संतोष साळुंके यांनी केले.

दिंद्रुड येथे भागवत दराडे मित्रपरिवारांच्या वतीने ‘पोवाडा - महाराष्ट्राची लोककला’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी साळुंके हे बोलत होते. शिवप्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. धारूरचे माजी नगरध्यक्ष माधव निर्मळ, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा सरचिटणीस भागवत दराडे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष अमोल जगताप, धारुर शहराध्यक्ष नितीन शिनगारे, राष्ट्रवादी काँग्रेस तालुका सरचिटणीस विश्वास शिनगारे, वांगी उपसरपंच मदन खाडे, राज बडे, अमोल ठोंबरे, नागेश वकरे, रंणजित रूपनर, सतिश सोळंके, उध्दव केकाण, आदि उपस्थित होते.

प्रास्ताविक करताना उद्योजक भागवत दराडे यांनी शाहिरांचे महत्त्व सांगत केले. शाहीर आपल्या कलेतून तरुणांमध्ये स्वातंत्र्याची आग ज्वलंत ठेवत असत. “नाही मरणाची आम्हा भिती गं, भरली अंगात स्वराज्याची स्पुर्ती गं” या सारख्या रचना त्या वेळच्या तरुणांच्या ओठी होत्या. महापुरुषांचे विचार पोवाड्याच्या माध्यमातून तरुणांमध्ये रुजावेत, समाजसुधारणा व्हावी, सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय ठेवा योग्य रित्या जपण्यासाठी लोककला जिवंत राहायला पाहिजे असे, मत दराडे यांनी बोलताना व्यक्त केले. यावेळी संतोष साळुंके यांनी पोवाड्याचा कार्यक्रम सादर केला.

एकाहून एक पोवाड्यांनी भारले वातावरण “ओम नमो श्री जगदंबे, नमन तुज अंबे करून प्रारंभे’ने पोवाडा कार्यक्रमास प्रारंभ झाला. त्यानंतर ‘कुणी गोविंद घ्या कुणी गोपाळ घ्या’, ‘या गं सयांनो या गं या’ ‘गिरीशिखरी गिरिटापरी, लहरी भगवा ध्वज’ ‘देखो मुल्क मराठों का, शिवाजी डोला था’ ‘चमके शिवबाची तलवार’ असे अनेक पोवाडे शिवशाहीर साळुंके यांनी आपल्या कलेतून सादर केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक उद्योजक भागवत दराडे यांनी केले तर सूत्रसंचालन सुरेश साळुंके व संतोष स्वामी यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...