आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परळी वैजनाथ:महानिर्मितीचे संच बंद, कंत्राटी कामगारांवर बेरोजगारीची वेळ; मागणी कमी असल्याने विद्युत निर्मिती बंद

परळी वैजनाथ2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • केंद्रातल्या तीन संचांतून एकूण 750 मेगावॅट विद्युत निर्मिती केली जाते.

लाँकडाऊन परिणाम आता सर्व क्षेत्रांत दिसू लागला आहे. विजेची मागणी कमी झाल्याने 6 मे पासून परळीत असलेल्या महानिर्मिती केंद्राचे सर्व संच बंद असल्याने कंत्राटी कामगारांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. शहरातील या औष्णिक विद्युत केंद्राच्या तीन संचांतून 750 मेगावॅट वीजनिर्मिती केली जाते. या महानिर्मिती केंद्रामुळे परिसरातील अनेक नागरिकांना छोटा मोठा रोजगार अवलंबून आहे. शहरात औष्णिक विद्युत केंद्र आहे या केंद्रातल्या तीन संचांतून एकूण 750 मेगावॅट विद्युत निर्मिती केली जाते.

या संचांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो वर्षातून अनेक वेळेस हे संच कोणत्या ना कोणत्या कारणाने बंदच असतात. कधी पाणी कमी पडणे, कधी कोळसा नसणे, दोन्ही उपलब्ध असेल तर या संचातून निर्माण होणारी वीज महाग पडण्याचे कारण सांगत, वीज निर्मिती बंद केली जाते. लाँकडाऊनमुळे विजेची मागणी कमी झाल्याने तीनही संच सध्या बंद आहेत. महाराष्ट्रातील इतर ठिकाणी असलेल्या औष्णिक विद्युत केंद्रातील बरेचशे संच सुरू आहेत, असे असतानाही परळी येथील संच का बंद केले जातात असा प्रश्न कंत्राटी बेरोजगारांना पडला आहे.

आधीच कोरोनामुळे संपूर्ण आर्थिक व्यवस्था विस्कळीत झाली असतांना परळी परिसरातील एकमेव रोजगाराचे साधन असलेल्या थर्मल पॉवर स्टेशन बंद असल्याने रोजनदारींवर काम करणाऱ्यांची वाणवा होत आहे. पण या औष्णिक विद्युत केंद्राकडे लक्ष देणार तरी कोण? अशी चर्चा नागरिकांतून होऊ लागली आहे.

मागणी कमी असल्याने विद्युत निर्मिती बंद
याबाबत अधिक माहितीसाठी औष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता मोहन आव्हाड यांच्याशी संपर्क साधला असता विजेची मागणी कमी झाल्यामुळे संच बंद करण्यात आले आहेत असे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...