आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्पर्धा:प्रसाद पाटील यांनी पटकावला आयर्नमॅन किताब

बीड4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नूर-सुलतान (कझाकिस्तान)येथे रविवारी (१४ ॲागस्ट २०२२) झालेल्या आयर्नमॅन ट्रायथलॉनमध्ये बीड जिल्ह्यातील पारगाव घुमरा येथील भूमिपुत्र प्रसाद पाटील यांनी भारताचे प्रतिनिधित्व करत १३ तास १५ मिनिटांत पूर्ण करून आयर्नमॅन किताब पटकावला आहे.

क्रीडा विश्वात आंतरराष्ट्रीय स्तरावर आयर्नमॅन स्पर्धा प्रतिकूल परिस्थितीवर मात करत पूर्ण करावी लागते. या स्पर्धेत सलग ३.८ किलोमीटर खुल्या जलप्रवाहात एकाच वेळी २००० इतर स्पर्धकांसोबत पोहावे लागते. त्यानंतर लगेच १८० किलोमीटर प्रचंड वेगाने वाहणाऱ्या वाऱ्याविरुद्ध सायकलिंग करावी लागते. त्याचबरोबर ४२.२ किलोमीटर धावावे लागते. आव्हान १६ तासांच्या आत पूर्ण करणाऱ्यास आयर्नमॅन हा किताब बहाल केला जातो.

बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र प्रसाद पाटील यांनी भारताचे प्रतिनिधित्व करत १३ तास १५ मिनिटांत हे अंतर पूर्ण केले. या स्पर्धेसाठी Powerpeaks academy मध्ये कोच असलेले चैतन्य वेल्हाळ यांचे मार्गदर्शन पाटील यांच्यासह ओमकार जोकार, स्वप्निल चिंचवडे, अश्विन भुते यांचे मार्गदर्शन त्यांना मिळाले. या यशाबद्दल प्रसाद पाटील यांचा पुण्यात सचिन साठे, भुलेश्वर नांदगुडे, अनिल संचेती, आनंद कुंभार, काळुशेठ नांदगुडे, विराज साठे, दाते साहेब, अश्विन भुते यांनी सत्कार करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

यापूर्वी जर्मनीतील स्पर्धेत केले होते आव्हान पूर्ण : यापूर्वी जर्मनीतील हॅम्बर्ग येथे २९ ॲागस्ट २०२१ रोजी झालेल्या आयर्नमॅन ट्रायथलॉनचे आव्हान प्रसाद पाटील यांनी यशस्वीरीत्या पूर्ण केले होते. त्यामुळे महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम विभागात अशी स्पर्धा पूर्ण करणारे ते पहिले अधिकारी ठरले होते.

बातम्या आणखी आहेत...