आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सत्कार‎:कक्ष अधिकारीपदी निवड झाल्याबद्दल‎ प्रशांत सवासे यांचा पाटोद्यात सत्कार‎

पाटोदा5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील नफरवाडी येथील प्रशांत‎ चांगदेवराव सवासे यांची महाराष्ट्र लोकसेवा‎ आयोगामार्फत घेण्यात आलेल्या २०२० मधील‎ परीक्षेत सहाय्यक कक्षा अधिकारी, मंत्रालय मुंबई या‎ पदावर निवड झाल्याबद्दल त्यांचा नगरपंचायतचे‎ नगरसेवक अॅड. सुशील कोठेकर, भाजपचे जिल्हा‎ उपाध्यक्ष अॅड. सुधीर घुमरे व मित्र परिवाराच्या‎ वतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पाटोदा‎ शहरातील नामवंत व्यापारी भारत दगडे, परमेश्वर‎ दगडे, दादासाहेब बनकर, संतोष लवांडे, सुरेश‎ नाईकनवरे, बाबासाहेब मुळे पाटील, विजयजी‎ जाधव, चांगदेव नाना सवासे अादी उपस्थित हाेते.‎

बीड जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्या जिल्हा‎ ‎ प्रसिद्धी प्रमुखपदी संजय रघुनाथ‎ ‎ हांगे यांची नियुक्ती करण्यात येत‎ ‎ असल्याची घोषणा मराठी‎ ‎ पत्रकार परिषदेचे राज्य जनसंपर्क‎ ‎ प्रमुख अनिल महाजन यांनी केली‎ ‎ आहे. जिल्ह्यात मराठी पत्रकार‎ परिषदेच्या प्रत्येक कार्याला व्यापक स्वरूपात प्रसिद्धी‎ देऊन संघटनेचे काम वाढवण्यासाठी व मजबूत‎ करण्यासाठी बीडमधील जिल्हा पदाधिकाऱ्यांशी‎ चर्चा करून संजय हांगे यांची प्रसिद्धी प्रमुखपदी‎ नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही‎ नियुक्ती पुढील दोन वर्षांसाठी असेल. मुख्य विश्वस्त‎ एस.एम देशमुख, विश्वस्त किरण नाईक अध्यक्ष‎ शरद पाबळे यांनी संजय हांगे यांचे अभिनंदन केले.‎

बातम्या आणखी आहेत...