आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

15 ईदगाहवर ईदची नमाज:ईदगाह समितीच्या वतीने सोमवारीच पूर्वनियोजन; ग्रामीण भागातही पूर्वतयारी, सुरक्षेसाठी पोलिस सज्ज

बीड19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महिनाभराच्या कडक उपवासानंतर ३ मे रोजी रमजान ईद जिल्ह्यात साजरी केली जाणार आहे. ईदच्या पूर्वसंध्येला बीड शहरासह जिल्हाभरातील बाजारपेठांत खरेदीसाठी मोठी गर्दी दिसून आली. ईदगाह समितीच्या वतीने प्रशासनाच्या साथीने ठिकठिकाणच्या ईदगाहवर सोमवारीच पूर्वनियोजन करण्यात आले. बीड शहरातील बालेपीर परिसरातील ईदगाह व पेठबीड परिसरातील जुने ईदगाह मैदान या ठिकाणी ईदची नमाज पार पडणार आहे. माजलगाव येथील मंजरथ रोड व पोलिस ठाणे परिसरातील ईदगाहवर नमाज होईल. गेवराईतही दोन ठिकाणी ईदची नमाज अदा केली जाणार आहे. वडवणी, पाटोदा, शिरूर, आष्टी, धारूर, केज, अंबाजोगाई, परळी येथील ईदगाहवरदेखील ईदगाह समितीने पूर्वतयारी केली आहे. ईदच्या दिवशीही जिल्ह्यात कडक बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याची माहिती पोलिस प्रशासनाने दिली.

मीना बाजार फुलला
बीड शहरातील कारंजा ते बशीरगंज परिसरात अडीचशे गाडे रस्त्यावर लागलेले आहेत. यासह मीना बाजारात ८५ दुकाने थाटण्यात आली आहेत. आठ दिवसांपासून या ठिकाणी कपडे, महिला, मुलींसाठीचे सौंदर्य प्रसाधने, सजावटीचे साहित्य, चप्पल, बूट, खाद्यपदार्थांचे स्टॉल, क्रॉकरी आदींची विक्री सुरू आहे. ग्राहकांचाही मोठा प्रतिसाद मिळाल्याने बाजार फुलून गेला आहे.

शहरातील ईदगाहवर या वेळी होणार नमाज अदा
बीड शहरातील बालेपीर नई ईदगाह येथे सकाळी ९.०० वा., इस्लामपुरा पुरानी ईदगाह ९.३० वाजता तर मरकज मशीद, जामा मशीद, मदिना मशीद येथे सकाळी ८.३० वा., मदरसा दारुलउलुम, झकेरिया मशीद, बारादरी मशीद येथे सकाळी ९.०० वा., दर्गाहवाली मशीद येथे ९.३० वाजता, तर एक मिनार मशीद येथे १० वाजता नमाज अदा होईल.

दोन वर्षांनंतर उत्साह
दोन वर्षांनंतर प्रथमच रमजान ईद मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार असून आठ दिवसांपासून बीड शहरासह तालुक्याच्या ठिकाणच्या मीना बाजारात खरेदीचा उत्साह दिसून आला.

बातम्या आणखी आहेत...