आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंचायत निवडणुक:पंचायत निवडणुकीसाठी भाजपबरोबर युतीची तयारी

परळी11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

परळी विधानसभा मतदारसंघातील सर्वच ग्रामपंचायत निवडणुकीत बाळासाहेबांच्या शिवसेनेचे उमेदवार उभे केले जाणार असून, भाजपा सोबत युती करण्याची आमची तयारी चालू आहे. जिथे युती होणार नाही तिथे स्वतंत्र पॅनल उभे करण्याची आमची तयारी असल्याचे बाळासाहेबांच्या शिवसेनेचे तालुका प्रमुख शिवाजी शिंदे व विधानसभा प्रमुख धनंजय गित्ते यांनी मंगळवारी परळीत सांगितले.

राज्यात भाजपा सोबत बाळासाहेबांची शिवसेनेची युती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्ही भवीष्यातील सर्व निवडणुका लढवणार आहोत. राज्याच्या माजी मंत्री पंकजा मुंडे व जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांच्या मार्गदर्शनाखाली परळी विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात आमची युती करून ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याची तयारी सुरू आहे. यासाठी सर्व कार्यकर्त्यांना आम्ही सूचना केलेल्या आहेत. शक्यतो युती करून निवडणूक लढवणार आहोत.

बातम्या आणखी आहेत...