आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधानसभा निवडणूक तयारी:बीडमध्ये पाया मजबुतीसाठी रिपाइं आठवले गटाची तयारी

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आगामी नगर परिषद, जिल्हा परिषद आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून रिपाइं आठवले गटाने बीड जिल्ह्यामध्ये पाया मजबूत करण्याची तयारी सुरू केली आहे. त्यासाठी विविध क्षेत्रातील, सामाजिक स्तरातील लोकांशी संपर्क साधला जात आहे.

त्याचाच एक भाग म्हणून बशीरगंज येथे पक्ष कार्यालयाच्या उद्घाटनाला माजी आमदार राजेंद्र जगताप, सिराज देशमुख यांच्यासह किमान चार हजार लोकांना निमंत्रित करण्यात आले होते. रिपाइं आठवले गट वंचित, उपेक्षितांच्या न्याय्य हक्कांसाठी कायम लढत राहील, असे युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष, बीड जिल्हाध्यक्ष पप्पू कागदे यांनी सांगितले. आगामी विधानसभा, जिल्हा परिषद, नगरपालिका निवडणुकीत भाजपकडून काही जागा मिळाव्यात, अशी आठवले गटाची मागणी असून त्यासाठी बीड जिल्ह्यात पायाभरणी सुरू झाल्याची चर्चा आहे.

बातम्या आणखी आहेत...