आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासाहित्य सम्राट अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त बीडमध्ये ‘साहित्य सम्राट गौरव महोत्सव’ आयोजित करण्यात आला असून बीड शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे गुरुवारी (ता.२८ जुलै) या महोत्सवाला सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी या महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. महोत्सवाच्या निमित्ता अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर आधारित एकूण ३५० लघुपट प्राप्त झाले होते. त्यापैकी २५ लघुपटांची निवड करून ते सादर करण्यात आले. बीडमध्ये साहित्यसम्राट आण्णाभाऊ साठे महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाची सुरुवात गुरुवार (ता.२८) झाली. या महोत्सवाचे उदघाटन साहित्यिक डॉ. सतीश साळुंके यांच्या हस्ते करण्यात आले तर सिनेअभिनेत्री रसिक चव्हाण, पेठ बीड विकास कृती समिती अध्यक्ष अमृत सारडा, प्रेमलता चांदणे, अॅड. अविनाश गंडले, शिक्षक नेते उत्तम पवार, भाजपाचे नेते सलीम जहांगीर, नगरसेवक भीमराव वाघचौरे, नगरसेवक गणेश वाघमारे, वंचितचे शिवराज बांगर, नगरसेवक विलास विधाते, नगरसेवक भैय्यासाहेब मोरे, नगरसेवक बाळू गुंजाळ, नगरसेवक मच्छिंद्र जोगदंड, पत्रकार महेंद्र मुधोळकर, सुनील डोंगरे, सुभाष लोणके, वंचित बहुजन आघाडीचे अनिल डोंगरे, भाजपाचे अजय सवाई, वडार समाज नेते शंकर विटकर, मनोज डरफे, बसपाचे प्रशांत वासनिक, डीपीआयचे प्रदेश अध्यक्ष तथा महोत्सवाचे निमंत्रक अजिंक्य चांदणे, निमंत्रक सतीश विटकर यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.
या साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या साहित्य सम्राट गौरव महोत्सवातील कार्यक्रमांना मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महोत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. योगेश क्षीरसागर, सचिव सतीश चांदणे, डीपीआयचे प्रदेश अध्यक्ष तथा निमंत्रक अजिंक्य चांदणे, निमंत्रक सतीश विटकर यांनी केले आहे. दरम्यान, यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाच्या प्रांगणात साहित्यसम्राट गौरव महोत्सव पार पडत असून त्या अनुषंगाने प्रांगणात आण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यातील विचारांवर आधारित फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे हे फलक लक्ष वेधून घेणारे ठरत आहेत.
असे होणार विविध कार्यक्रम
यशवंतराव चव्हाण नाट्यगृह येथे शुक्रवारी (ता.२९ जुलै) सायंकाळी ६ वाजता लहुजी वस्ताद शरीरसौष्ठव स्पर्धा पार पडेल. शनिवारी (ता.३०) सायंकाळी ५ वाजता गायिका कडूबाई खरात यांचा ‘गाणे अण्णाभाऊंचे’ हा कार्यक्रम होणार आहे. आण्णाभाऊ साठे सभागृह येथे रविवारी (ता.३१ जुलै) सकाळी ११ वाजता ५०० महिलांना साड्यांचे वाटप केले जाईल. यासह सोमवारी (ता.१ ऑगस्ट) रोजी सकाळी शहरातून अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याची दिंडी काढण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.