आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:राष्ट्रपती पुरस्कारप्राप्त शिक्षक शशिकांत कुल्थे यांचा सत्कार

बीड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील केएसके महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी शशिकांत कुल्थे यांना राष्ट्रपती पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांचा प्राचार्या डॉ. दीपाताई क्षीरसागर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. येत्या ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गेवराई तालुक्यातील दामू नाईक तांडा, केंद्र पाचेगाव येथील शिक्षक शशिकांत कुल्थे यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवले जाणार आहे.

कुल्थे हे केएसके महाविद्यालयाचे संगीत विषयाचे माजी विद्यार्थी आहेत. प्रभारी प्राचार्य डॉ. शिवानंद क्षीरसागर, उपप्राचार्य व नाट्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. संजय पाटील देवळाणकर, उपप्राचार्य डॉ. शिवाजी शिंदे, पदव्युत्तर विभागप्रमुख डॉ. सतीश माऊलगे, डॉ. एस. एल. गुट्टे, कमवि उपप्राचार्य एल. एन. सय्यद, पर्यवेक्षक जालिंदर कोळेकर, कार्यालयीन अधीक्षक डॉ. विश्वंभर देशमाने आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...