आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोर सेनेचा दणका:गेवराई तालुक्यात दोन बालविवाह रोखले; वधूसह आई-वडील ताब्यात; गोर सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे कारवाई

गेवराई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
गोर सेना जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांच्यासह संजय राठोड आदी. - Divya Marathi
गोर सेना जिल्हाध्यक्ष सतीश पवार यांच्यासह संजय राठोड आदी.
  • 18 वर्षांचे वय पूर्ण झाल्यावर विवाह करण्याचे लिहून घेतले शपथपत्र

शासनाने बालविवाहांतर्गत विविध कायदे केले असले तरी ग्रामीण भागात चोरीछुपे बालविवाह लावण्याचे प्रकार घडत आहेत. आदल्या व स्वातंत्र्यदिनी तालुक्यातील गढीसह केकतपांगरी अशा दोन ठिकाणी बालविवाह उरकले जात असल्याची माहिती गोर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसांना देताच पोलिस पथकाने गावात जाऊन दोन्ही ठिकाणचे विवाह थांबवले. दरम्यान, दोन्ही वधूंसह त्यांच्या आई-वडिलांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेऊन बीडच्या बालकल्याण समितीसमोर हजर केले असता जोपर्यंत मुलीच्या वयाची १८ वर्षे पूर्ण होत नाही तोपर्यंत मुलींचे लग्न लावणार नसल्याचे बाल कल्याण समितीने शपथपत्र लिहून घेतले आहे.

गेवराई तालुक्यातील गढी आणि केकतपांगरी अशा दोन ठिकाणी शनिवार, १४ ऑगस्ट व रविवार १५ ऑगस्ट अशा दोन दिवसांत दोन बालविवाह लावण्यात येत असल्याची माहिती गोर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. संदेशभाऊ चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा अध्यक्ष सतीश पवार यांच्यासह संजय राठोड, विजय राठोड, बाळराजे राठोड, अण्णासाहेब चव्हाण, साहेबराव चव्हाण, नितीन राठोड, जाधव ईश्वर, जाधव सचिन, रवी राठोड, प्रकाश राठोड, संजय चव्हाण, आकाश पवार, सुरेश राठोड, गोविंद राठोड, माणिक राठोड या पदाधिकाऱ्यांनी गेवराई पोलिसांना दिली होती.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी सुरुवातीला गढी व दुसऱ्या दिवशी याच तालुक्यातील केकतपांगरी येथे भेट देऊन झाडाझडती घेतली. गावात १४ वर्षांच्या अल्पवयीन मुलीचा विवाह २२ वर्षांच्या मुलाबरोबर लावण्यात येणार असल्याची माहिती मिळताच गेवराई पोलिसांनी गावात जाऊन हा विवाह थांबवला.

६ जणांना केले हजर
दोन्ही ठिकाणच्या वधू व त्यांचे आई-वडील अशा सहा जणांना बालकल्याण समिती येथे हजर केल्याची माहिती गेवराई पोलिस ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक अर्चना भोसले यांनी दिली. जोपर्यंत या दोन्ही मुलींचे वय १८ वर्षे पूर्ण होत नाही तोपर्यंत विवाह केला जाणार नाही, असे शपथपत्र दोन्ही मुलींच्या आई-वडिलांकडून संबंधित प्रशासनाने लिहून घेतले.

बातम्या आणखी आहेत...