आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुजाऱ्याचा खून:अंबाजोगाईमध्ये गुढीपाडव्याच्या दिवशी पुजाऱ्याचा चाकूने भोसकून खून, धक्कादायक घटनेने खळबळ

अंबाजोगाई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीडच्या अंबाजोगाई येथे भर दिवसा पुजाऱ्याची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अंबाजोगाई शहरालगत असलेल्या शेपवाडी येथे हनुमान मंदिराचे पुजारी संतोष दासोपंत पाठक ( वय 50 , रा . रविवार पेठ , अंबाजोगाई ) यांचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. ही घटना शनिवारी म्हणजेच आज दुपारी 1 वाजता घडली आहे.

पुजारी संतोष पाठक हे शेपवाडी गावातील सर्व पूजाअर्चा करायचे. मिळालेल्या माहितीनूसार, आज सर्वत्र गुडीपाढवाचा सण असल्याने पुजारी संतोष पाठक हे सकाळपासूनच शेपवाडी गावातील हनुमान मंदिरात थांबले होते. दुपारी 1 ते दीड वाजेच्या दरम्यान एका माथेफिरूने त्यांच्यावर चाकूने अनेक वार केलेत. माथेफिरू जेव्हा वार करत होता, तेव्हा काही महिला त्या ठिकाणी उपस्थित होत्या काही महिलांनी दगड मारुन पाठक यांना सोडण्यासाठी प्रयत्न देखील केले. मात्र, माथेफिरु हल्ला करतच राहिला. ग्रामस्थांनी गंभीर जखमी झालेल्या पाठक यांना तातडीने स्वाराती रुग्णालयात दाखल केले, परंतु तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले . या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे .

सदरील माथेफिरुने खून का केला त्याचा तपास सध्या पोलिस करत आहेत. सध्या पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. बीड जिल्ह्यात खुनाच्या घटनेत वाढ होत असल्याने पुन्हा कायदा आणि सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

बातम्या आणखी आहेत...