आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रतिपादन:प्रधानमंत्री पीक विमा योजना फसवी;  ज्येष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांचे परळी येथे प्रतिपादन

परळी24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रधानमंत्री पिकविमा योजना शेतकऱ्यांठी विशेषतः छोट्या शेतकऱ्यांसाठी फसवी आहे. ही पिकविमा योजना रद्द करुन राज्याची नवी पिकविमा योजना सुरु करण्यासाठी शेतकऱ्यांनी संघटीतपणे लढा उभारावा असे आवाहन शेती अभ्यासक जेष्ठ पत्रकार पी.साईनाथ यांनी केले.

बुधवारी विभागीय पीक विमा परिषद झाली. या प्रसंगी पी.साईनाथ व डॉ.अजित नवले यांच्यासह पी.एस.घाडगे, अर्जुन आडे, उमेश देशमुख, भगवान भोजने, उध्दव पौळ, दिपक लिपने, शंकर सिडाम, कॉ जगदिश फरताडे आदींची उपस्थिती होती. पी. साईनाथ म्हणाले, शेतकरी विरोधी कायदे हे सरकारी वकिलांनी न करता खासगी कंपन्यांच्या वकिलांनी बनवून खाजगी कंपनीला नफा मिळवुन देण्यासाठी मंजूर केले. राफेल घोटाळ्यानंतर सर्वात मोठा घोटाळा प्रधानमंत्री पीक विमा योजना असल्याचे सांगत अनेक राज्यांनी या योजनेला नाकारत राज्याची स्वतःची पीक विमा योजना अंमलात आणली आहे. महाराष्ट्रात या पद्धतीने पिक विमा योजना आणण्याची गरज असल्याचे सांगितले. पीम विमा परिषदेत हात उंचावून अभिवादन करताना मान्यवर.

किसान सभेच्या पीक विमा परिषदेस प्रतिसाद; कंपन्यांनी ५ हजार कोटी कमावले : नवले
डॉ.अजित नवले यांनी २०२० मध्ये ११९ लाख शेतकऱ्यांनी पीक विमा भरला परंतु बीड व मराठवाड्यात ७२ तासात नुकसानीची ऑनलाईन माहिती न भरल्याचे कारण ५ हजार कोटींचा नफा विमा कंपनीने कमावल्याचे सांगितले.अजय बुरांडे यांचेही भाषण झाले. प्रास्ताविक मुरलीधर नागरगोजेंनी केले.

बातम्या आणखी आहेत...