आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुदतवाढ:पंतप्रधान किसान सन्मान निधी, 31 जुलैपर्यंत मुदतवाढ दिली : जिल्हाधिकारी

बीड11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंतप्रधान किसान सन्मान निधीचा लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांना बँक खात्याची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र जिल्ह्यात अजूनही १ लाख ८७ हजार शेतकऱ्यांनी बँक खात्याची ई-केवायसी केलेली नाही. त्यामुळे या योजनेला आता ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती उपजिल्हाधिकारी संतोष राऊत यांनी दिली.

शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपयांचा लाभ देण्याची योजना पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या नावाने केंद्र शासनाकडून सुरू आहे. बीड जिल्ह्यातील ४ लाख ७८ हजार ७०२ शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळतो. हा लाभ असाच सुरू ठेवण्यासाठी सर्वच खातेधारकांनी आपल्या बँक खात्याची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. यासाठी यापूर्वीचीच मुदत दिली गेली होती. दरम्यान, जिल्ह्यातील ४ लाख ७८ हजारांपैकी केवळ २ लाख ९१ हजार ४०७ शेतकऱ्यांनी ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली असून अद्यापही १ लाख ८७ हजार २९५ शेतकऱ्यांनी केवायसी केलेली नाही. केवायसी करण्यासाठी आता ३१ जुलै ही मुदत दिली गेली आहे.

काय आहे ई-केवायसी
केवायसी ही ग्राहकांच्या पडताळणीची बँकांची एक प्रक्रिया असते. यात आपला ग्राहक कोण आहे हे बँक जाणून घेते (नो युवर कस्टमर) यालाच संक्षिप्त रूपात केवायसी म्हणतात. भारतात २००२ मध्ये केवायसी सुरू केली गेली. इलेक्ट्रॉनिक पद्धतीने होत असलेल्या या प्रक्रियेला ई-केवायसी म्हणतात. आधार कार्ड देऊन ही प्रक्रिया करता येते.

केवायसी करून घ्या
जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी अद्याप पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या बँक खात्याची ई-केवायसी अपडेट केलेली नाही, त्या शेतकऱ्यांनी तत्काळ ही प्रकिया पूर्ण करुन घ्यावी. ३१ जुलैपर्यंत यासाठी मुदत असली तरी वाट न पाहता प्रक्रिया करावी. - संतोष राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी, बीड

२ लाख ९१ हजार ४०७ शेतकऱ्यांनी केली ई-केवायसीची प्रक्रिया पूर्ण
...तर बंद पडेल लाभ

पंतप्रधान किसान सन्मान निधी या योजनेअंतर्गत एका शेतकऱ्याला वर्षाकाठी सहा हजार रुपयांचा लाभ दिला जातो. वर्षात एकूण तीन टप्प्यांत प्रत्येकी दोन हजार रुपये यातून मिळतात. मात्र, आता लाभ मिळणाऱ्या या खात्याची शेतकऱ्यांनी ई-केवायसी केली नाही तर हा लाभ बंद पडू शकतो.

बातम्या आणखी आहेत...