आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेवापूर्ती समारंभ‎:श्री गणेश विद्या मंदिर चे मुख्याध्यापक‎ एस.डी. गुळवे यांचा सेवापूर्ती समारंभ‎

अंमळनेरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

रयत शिक्षण संस्थेच्या श्री गणेश‎ विद्यामंदिर विद्यालयाचे मुख्याध्यापक एस.डी.गुळवे‎ यांचा सेवापूर्ती कृतज्ञता समारंभ उत्साहात संपन्न‎ झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रयत शिक्षण‎ संस्थेचे जनरल बॉडी सदस्य ए.टी.पोकळे होते.‎ कार्यक्रमाच्या सुरुवातीला रयत शिक्षण संस्थेचे‎ संस्थापक, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रतिमेचे‎ पूजन करण्यात आले.

त्यानंतर कार्यक्रमाला उपस्थित‎ मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.‎ प्रास्तविक सहशिक्षक मनोज पोकळे यांनी केले. सर्व‎ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांच्यावतीने मुख्याध्यापक‎ एस.डी.गुळवे यांचा शाल, पुष्पगुच्छ तसेच पितळी‎ हंड्याच्या स्वरूपात भेटवस्तू देऊन सपत्नीक सत्कार‎ करण्यात आला. रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी‎ सदस्य व कमिटी सदस्य ए.टी.पोकळे यांनी‎ मुख्याध्यापक गुळवे यांच्या कार्यकाळात शाखेच्या‎ झालेल्या भौतिक व शैक्षणिक विकासाबाबत सविस्तर‎ माहिती दिली.‎

बातम्या आणखी आहेत...