आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या:बीड शहरात हॉटेलमध्ये मुख्याध्यापकाची आत्महत्या, मानसिक त्रासाला कंटाळून उचलले पाऊल

बीड2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील चहाच्या टपरीवजा हॉटेलच्या बांबूला दोरीने गळफास घेऊन एका अनोळखी व्यक्तीने आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास समोर आली. मृत व्यक्ती सासुरा (ता.केज) येथील जि.प.शाळेच्या मुख्याध्यापक असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली.

शिवाय त्याच्या खिशात एक सुसाइड नोट सापडली असून मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचे त्यात नमूद केले असल्याची माहिती बीड शहर पोलिसांनी दिली आहे. त्या अनुषंगाने आता पोलिस तपास करत आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, भारत सर्जेराव पाळवदे (४०) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. पाळवदे हे सासुरा (ता.केज) येथील जि.प.शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. त्यांनी सोमवारी रात्री ११ ते ११.३० वाजेच्या दरम्यान आत्महत्या केली. दरम्यान, पाळवदे यांच्या खिशात एक सुसाइड नोट सापडली. त्यात चार ते पाच जणांची नावे असल्याचे सांगण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...