आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनाचा बळी:कसाबची सुरक्षा व्यवस्था सांभाळलेल्या कारागृह अधीक्षकांचा कोरोनाने मृत्यू

बीड24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मंगळवारी घरी परतल्यावर पुन्हा त्रास, बुधवारी संजय कांबळेंचा मृत्यू

बीड जिल्हा कारागृहाचे सहायक अधीक्षक संजय कांबळे यांचा बुधवारी सकाळी कोरोनाने मृत्यू झाला. मुंबईत नोकरीला असताना कुख्यात दहशतवादी अजमल कसाबच्या सुरक्षा व्यवस्थेत असलेल्या संजय कांबळे (४१) यांनी या अनुभवांवर आधारित पुस्तकाचे लिखाण सुरू केले होते. मात्र त्यापूर्वीच त्यांचा काेराेनाने बळी घेतला. जिल्ह्यातील एक काेराेना योद्धा धारातीर्थी पडला. जिल्ह्यात आतापर्यंत एक परिचारिका, दोन पोलिसांचा कोरोनाने मृत्यू झाला होता. आता एक वरिष्ठ अधिकारी धारातीर्थी पडला आहे.

बीड जिल्ह्यात कोरोनाने आतापर्यंत १३ हजार ६८९ जण बाधित झाले असून ४२८ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्हा कारागृहातही कोरोनाचा शिरकाव झाला असून सुमारे ७० कैद्यांसह दोन अधिकारी व त्यांचे कुटुंबीय बाधित झाले होते. कांबळे दहा दिवसांपूर्वी कोरोनाने बाधित झाले होते. बीड येथील एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मंगळवारी त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली होती. घरी आल्यानंतर रात्री त्यांना अचानक श्वास घेण्यास त्रास होऊ लागला रुग्णालयात दाखल केले, मात्र सकाळी त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी व भाऊ,आई, वडील असा परिवार आहे.