आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वितरण‎:फुकेवाडी जिल्हा परिषद शाळेत‎ गुणवंतांना बक्षीस वितरण‎

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील लिंबागणेश केंद्रातील जिल्हा‎ परिषद प्राथमिक शाळा फुकेवाडी या ठिकाणी‎ प्रजासत्ताक दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध‎ स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या‎ अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नागरिक अश्रुबा मानकर होते तर‎ प्रमुख पाहुणे म्हणून ग्रुप ग्रामपंचायत पिंपरनईचे‎ उपसरपंच बाळासाहेब वायभट हे हजर होते.

यावेळी‎ विविध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या‎ हस्ते बक्षिसे देण्यात आली. यावेळी दिगंबर मानकर,‎ रामचंद्र मानकर, भानुदासराव काळे, कुंडलिक काळे,‎ नवनाथ मानकर, अर्जुनराव मानकर, सुभाष पवार,‎ अंबादास मानकर, माजी ग्रामपंचायत सदस्य नामदेव‎ पवार, देवराव काळे, शिवाजी काळे, बाळासाहेब‎ काळे, बालवाडीताई अर्चना पवार, जालिंदर पवार,‎ संजय पवार, जरे आदी हजर होते.‎

बातम्या आणखी आहेत...