आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिरवणूक‎:अंबाजोगाईत शहीद भगतसिंग‎ यांच्या जयंतीनिमित्त मिरवणूक‎

अंबाजोगाई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अंबाजोगाई‎ महान क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांच्या ‎जयंतीनिमित्त शहरातून मिरवणूक काढण्यात‎ आली. एसएफआय व डीवायएफआय या‎ विद्यार्थी, युवक संघटनेच्या पुढाकारातून ही भव्य ‎मिरवणूक काढण्यात आली होती. संघटनेच्या‎ वतीने काढण्यात आलेल्या मिरवणुकीला‎ तरुणाईचा उदंड प्रतिसाद मिळाला.‎ अंबाजोगाई शहरातील क्रांतीनगर आणि‎ लालनगर या परिसरातून ही भव्य मिरवणूक‎ निघाली, ठिकठिकाणी “टेंभा लेझीम”चे प्रभावीपणे ‎सादरीकरण करीत ही मिरवणूक सदरबाजार,‎ छत्रपती शिवाजी महाराज चौक, बसस्थानक, ‎राजमाता अहिल्यादेवी होळकर चौक मार्गे पार‎ पडली.

या मिरवणुकीची सांगता मंगळवार पेठ‎ भागातील शहीद भगतसिंग चौकातील‎ नामफलकास अभिवादन करून करण्यात आली.‎ शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेला डीवायएफआयचे‎ जिल्हा उपाध्यक्ष सुहास चंदनशिव, तालुकाध्यक्ष‎ देविदास जाधव, तालुका सचिव प्रशांत मस्के,‎ एसएफआयचे हनुमंत शिंदे, सचिन टिळक,‎ जन्मोत्सव समितीचे अध्यक्ष बबलू सरवदे,‎ उपाध्यक्ष गोविंद सरवदे, सचिव प्रदीप घनगाव,‎ कोषाध्यक्ष तुकाराम इंगळे, राजू इंगळे, अभिजीत‎ इंगळे, करण इंगळे, तेजस जोगदंड यांच्या हस्ते‎ अभिवादन करण्यात आले. प्रास्ताविक‎ डीवायएफआयचे तालुका सचिव प्रशांत मस्के यांनी‎ केले.

या वेळेस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित‎ असलेले डीवायएफआयचे जिल्हा सचिव विशाल‎ देशमुख यांनी पुढील काळात शहीद भगतसिंगांच्या‎ विचारांना आत्मसात करून भविष्याची लढाई‎ लढावी लागेल, असे सांगितले. सूत्रसंचालन‎ डीवायएफआयचे अंबाजोगाई तालुकाध्यक्ष‎ देविदास जाधव यांनी केले. यावेळी विजय पोळे,‎ विक्रम आगळे, जगन्नाथ पाटोळे, सचिन टिळक,‎ राहुल भावठाणकर, विजय मेटे, सिद्राम सोळंके,‎ आश्रुबा घनगाव, सुभाष भोसले, राजू इंगळे, करण‎ इंगळे, अभिजित इंगळे, तेजस जोगदंड, सुभाष‎ भोसले, किशोर घाडगे, आकाश पौळे, आकाश‎ घनगाव, अमोल भोसले, अजहर शेख, तौफिक‎ शेख, आकाश भोसले आदी उपस्थित होते.‎

बातम्या आणखी आहेत...