आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव:प्रा. अभिजित लोहिया, श्याम सरवदे, शेख यांचा आज गौरव

अंबाजोगाई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशाच्या स्वातंत्र्य अमृतमहोत्सवी वर्षाच्या निमित्ताने येथील योगेश्वरी शिक्षण संस्था कर्मचारी पतसंस्थेच्या वतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे प्रा. अभिजित लोहिया, श्याम सरवदे, मुक्तार शेख यांना २० ऑगस्ट रोजी पुरस्कार देऊन गौरव करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष एस. पी. कुलकर्णी यांनी दिली.

अंबाजोगाई येथील प्रा.अभिजीत लोहिया यांना स्व. प्राचार्य बी.के.सबनीस सद्भावना पुरस्कार देऊन तर श्याम सरवदे आणि मुक्तार शेख यांनाही पतसंस्थेच्या वतीने पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे. या वेळी पतसंस्थेचे अध्यक्ष एस.पी. कुलकर्णी, सचिव एस. बी. शिंदे, उपाध्यक्ष राजू साळवी, कोषाध्यक्ष एस. व्ही. चौधरी, सहसचिव बी. के. मसने, संचालक दीपक देवळे, अजय चौधरी, आर. आर. परळीकर, प्रवीण भोसले, के. बी. नांदगांवकर, बी. सी. स्वामी, वैभव चौसाळकर, चंद्रकांत कांबळे, प्रकाश आकुसकर उपस्थित राहणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...