आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऊसतोड कामगार संघटना:वंचितचे प्रा. शिवराज बांगर यांनी मनसेमध्ये केला प्रवेश ; ठाकरेंच्या उपस्थितीत झाला कार्यक्रम

बीड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वंचित बहुजन आघाडीचे ऊसतोड कामगार संघटनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा.शिवराज बांगर पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबई येथील रवींद्र नाट्यमंदिर येथे झालेल्या मेळाव्यात मंगळवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला. यावेळी त्यांनी येत्या काळात मनसेतून संघर्ष करू. सर्वसामान्यांसह ऊसतोड कामागर प्रश्नी आवाज उठवत राहू, अशी ग्वाही प्रा.शिवराज बांगर यांनी दिली.

यावेळी मनसे नेते दिलीप धोत्रे, प्रदेश सरचिटणीस संतोष नागरगोजे, राज्य उपाध्यक्ष अशोक तावरे, उपाध्यक्ष सतनाम सिंग गुलाटी, महिला आघाडीच्या राज्य उपाध्यक्ष वर्षा जगदाळे, बीड जिल्हाध्यक्ष सुमंत धस, श्रीराम बादाडे, राजेंद्र मोटे, संभाजीनगरचे जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर आदी उपस्थित होते.

प्रा.शिवराज बांगर म्हणाले, वंचित बहुजन आघाडीमध्ये जीवाचे रान करून कार्य केले. परंतु, मला खोट्या गुन्ह्यात गोवण्यात आले, तेव्हा माझ्यावरील गुन्हा व एमपीडीएची कारवाई ही वैयक्तिक स्वरूपाची असल्याचे सांगत पक्षाकडून कसल्याही प्रकारचे सहकार्य करण्यात आले नाही. त्यामुळे आपला कोणावरही वैयक्तिक राग नसून समर्थक, सहकाऱ्यांच्या भावनेचा आदर ठेऊन मनसेत जाण्याचा निर्णय घेतला. आजपर्यंत चळवळीत काम केले असून ऊसतोड कामगारांसह गोरगरीबांच्या प्रश्नावर आवाज उठवत आलो आहे. येत्या काळात मनसेत संघर्ष करू, ऊसतोड कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटीबद्ध आहे, असे प्रा.शिवराज बांगर म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...