आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोनपेठ तणावमुक्त आनंदी जीवन जगण्यासाठी नियमीत योगा करून आपण आपल्या शरीरातील होणारे बदल टाळु शकतो असे मत प्रा. विठ्ठल जायभाये यांनी व्यक्त केले. आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधत सोनपेठ पंचायत समितीमधील तालुका अभियान व्यवस्थापन कक्षाच्या वतीने ग्रामीण भागातील स्वयंसहाय्यता समुहाचे काम करणाऱ्या महिलांसाठी अ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी ते बोलत होते. प्रा. जायभाये म्हणाले, महिलांना अतिकष्टाचे कामे करावी लागतात.
शरीरातील होणाऱ्या बदलांकडे लक्ष योग्य वेळी न दिल्याने अनेक आजारांचा सामना करावा लागतो. हे टाळायचे असेल तर सकाळी कोमट पाणी पिणे वेगवेगळ्या प्रकारचे आसने करणे फायदेशीर ठरते. योगासनांमध्ये, ताडासन, हलासन, पवनमुक्तासन, अर्धपवनमुक्तासन, भुजंगासन, मंडुकासन व कपालभाती यासारखी आसने केल्यास शरिरातील साखरेवर नियंत्रण रहाते. वजन व चरबी कमी होवून रक्ताभिसरण वेगाने होण्यास मदत होते. म्हातरपणात कमी समस्या उदभवतात.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला तालुका अभियान व्यवस्थापक बाबासाहेब हिरवे यांनी प्रा.डॉ विठ्ठल जायभाये सन्मान केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभाग समन्वयक विशाल चौरे यांनी केले व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी स्वप्नील पोतदार, प्रभाग समन्वयक प्रदिप हरनावळ , अंकुश रसाळ,किरण राठोड ,दत्ता इंगळे ,पांचाळ,यांनी मोलाचे सहकार्य केले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.