आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बीड:प्राध्यापिकेचा विनयभंग केल्याप्रकरणी प्राध्यापकाला पाच वर्षांची सक्तमजुरी, पॉर्न व्हिडिओ लिंकप्रकरणी बीड न्यायालयाचा निकाल, 8 हजारांचा दंडही

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शहरातील एका नामांकित महाविद्यालयात पीडित महिला प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे.

सहकारी प्राध्यापिकेला मोबाइलवर पॉर्न साइटची लिंक पाठवत पाठलाग करून विनयभंग केला व जातिवाचक शिवीगाळ केल्याच्या प्रकरणात येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने एका प्राध्यापकाला ५ वर्षांची सक्तमजुरी व ८ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. न्या. डी. एन. खडसे यांनी हा निकाल दिला. या प्रकरणात सरकारी पक्षाच्या वतीने अॅड. बी. एस. राख यांनी काम पाहिले.

शहरातील एका नामांकित महाविद्यालयात पीडित महिला प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. याच महाविद्यालयात गजानन नरहरी करपे (४५, रा. बीड) प्राध्यापक म्हणून काम करत होता. १४ नोव्हेंबर २०१७ रोजी प्रा. करपेने या प्राध्यापिकेला रात्री उशिरा व्हाॅट्सअॅपद्वारे ३० पॉर्न व्हिडिओंची लिंक पाठवली होती. संस्था प्रशासनाकडे तक्रार केल्यानंतर लहान मुलाने लिंक पाठवल्याचा खुलासा त्याने केला हाेता. पण १४ फेब्रुवारी २०१८ रोजी आपणच लिंक पाठवल्याचे सांगत या महिलेस त्याने शिवीगाळ केली. शिवाजीनगर पोलिसांत विनयभंग व अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंद करण्यात आला. दरम्यान, संस्थेेने प्रा. करपे याला निलंबित केले होते.

सरकारी पक्षाच्या वतीने सहायक सरकारी वकील अॅड. बी. एस. राख यांनी याप्रकरणी बाजू मांडली त्यांना अॅड. अविनाश गंडले यांनी मदत केली. सरकारी पक्षाकडून या प्रकरणात एकूण ८ साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी पक्षाने केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्या. खडसे यांनी गजानन करपे याला ५ वर्षे सक्तमजुरी व ८ हजार रुपयांचा दंड ठोठावला.

साक्ष दिल्यानंतर पतीचे निधन
प्राध्यापिकेच्या पतीने याप्रकरणी न्यायालयात साक्ष दिल्यानंतर आठ दिवसांनंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आला अन् त्यांचा मृत्यू झाला होता. तर, प्रा. करपे यानेही अनेक वेळा वेगवेगळा बचाव घेत संस्था प्रशासनावरही आरोप केले.

बातम्या आणखी आहेत...