आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा:प्राध्यापकाचे आत्महत्या प्रकरण; पत्नीवर पोलिसांत गुन्हा दाखल

बीडएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विनाअनुदानित महाविद्यालयात विनावेतन काम करणाऱ्या पतीला तू काही कामाचा नाहीस म्हणून पत्नी सतत अपमानास्पद वागणूक देत असे. अखेर तिच्या त्रासाला कंटाळून पतीने १५ मे रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. याप्रकरणी पत्नीवर शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला. नितीन विठ्ठलराव तूपसौंदर (३८, रा. नगर रोड, बीड) असे मृत तरुणाचे नाव आहे.

नितीनची बहीण सीमा अनिल लोंढे यांच्या फिर्यादीनुसार, ३ वर्षांपूर्वी त्याचे लग्न सुजातासोबत झाले होते. नितीन हा पिंपळनेर येथील विनाअनुदानित महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून विनावेतन कर्तव्यावर होता. त्यामुळे सुजाता नेहमी त्याच्याशी वाद घालत असे. तुम्ही माझ्यावर संशय घेता म्हणून तिने नितीनला मारहाण केली होती.

त्यानंतर तुला पगार नाही, तू घरातले सर्व कामे का करत नाहीस, मला दागिने घेत नाहीस, तू काही कामाचा नाहीस, १५ मे रोजी नितीनने वडिलांना फोन केला आणि पत्नीच्या वागण्यामुळे मला मानसिक आणि शारीरिक त्रास होत असल्याने आत्महत्या करणार असल्याचे सांगितले. त्यामुळे वडिलांनी घराकडे धाव घेतली, परंतु त्यापूर्वीच नितीनने पत्नीच्या ओढणीने फॅनला गळफास घेऊन आत्महत्या केली होती, असे फिर्यादीत नमूद आहे

बातम्या आणखी आहेत...